श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात मांसाहार, लसूण आणि कांद्यासारखे पदार्थ खाणे वर्ज्य मानले जाते. सर्वसाधारणपणे यामागे केवळ धार्मिक कारण सांगितले जात असले, तरी वैज्ञानिक आणि आरोग्याशी संबंधित दृष्टिकोनही दडलेला आहे.
मान्सून आणि पचनशक्तीवर होणारा परिणाम :
श्रावण महिना पावसाळ्यात येतो. या काळात हवेत जास्त दमटपणा असतो, ज्यामुळे सूक्ष्मजीव, बॅक्टेरिया आणि फंगस वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. या ऋतूत माणसांची पचनशक्ती कमकुवत झालेली असते. आशा काळात पचायला जड आणि मांसाहारी भोजन केल्यास गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या शारीरिक समस्या उद्भवतात. त्यामुळे या काळात हलका आहार घेणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.
Nashik : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहे. धरणं देखील ओसांडून ...
श्रावणात मांसाहार केल्याने काय होते?
या काळात मटण, चिकन किंवा मासे योग्य तापमानात ठेवले नाहीत किंवा योग्य पद्धतीने शिजवले गेले नाहीत, तर ते लवकर खराब होतात. असे अन्न खाल्ल्याने पोटात इन्फेक्शन, फूड पॉयझनिंग आणि डायरियासारख्या आजारांची जोखीम अनेक पटीने वाढते.
प्राचीन काळात फ्रिज किंवा आधुनिक शीतकरणाची सुविधा नसल्यामुळे या आजारांपासून बचाव करण्यासाठी मांसाहार बंद केला जात होता. मान्सूनदरम्यान पचनक्षमता कमकुवत होत असल्याने आरोग्य तज्ज्ञदेखील ताजा, हलका आणि सहज पचणारा आहार घेण्याचा सल्ला देतात.
उत्तर प्रदेश : ज्या हातांनी कौतुकाने कुरवाळायला हवे होते, ज्या बापाच्या कुशीत सुरक्षिततेचा निवारा मिळायला हवा होता, त्याच नराधम बापाने आणि भावाने ...
आयुर्वेदानुसार योग्य आहार :
या काळात हिरव्या भाज्या आणि साधा आहार घेतल्याने शरीराला आवश्यक पोषण तर मिळतेच, शिवाय पचनतंत्रावर कोणताही अतिरिक्त ताण येत नाही. आयुर्वेदात या गोष्टीचा विशेष उल्लेख आढळतो की, पावसाळ्यात असा आहार घ्यावा जो शरीराला पुरेशी ऊर्जा देईल, पण पोटाला जडपणा आणणार नाही.
प्रजनन काळ :
श्रावण महिना विशेषतः पाण्यात राहणाऱ्या सजीवांसाठी प्रजननाचा काळ असतो. जर तुम्ही यावेळी मांसाहारी पदार्थ खाल्ले तर ते जलचर सजीवांच्या प्रजनन प्रक्रियेत अडथळा आणेल. म्हणून मांसाहारी पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो.






