मुंबई: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची आधीची बायको सुजैन खानने २६ ऑक्टोबरला आपला ४९वा बर्थडे सेलिब्रेट केला. बर्थडेला सुजैनला स्पेशल फील करण्यासाठी बॉयफ्रेंड अर्सलान गोनीने कोणतीही कमतरता सोडली नाही.
सुजैनच्या बर्थडेला अर्सलान गोनीने रोमँटिक पोस्ट करत स्पेशल अंदाजामध्ये विश केले. अर्सलानने सुजैनसोबत आपला रोमँटिक फोटोंचा एक व्हिडिओ बनवून आपल्या इन्स्टा हँडलवर शेअर केला. फोटोमध्ये सुजैन आणि अर्सलान एक दुसऱ्यांसोबत रोमँटिक होत असतात.
दोघेही अनेक फोटो तसेच व्हिडिओमध्ये एकमेकांना किस करतानाही दिसत आहेत. सुजैनसोबत रोमँटिक मूमेंट शेअर करताना अर्सलानने लेडी लव्हसाठी एक लिव्हिंग कॅप्शनही लिहिले आणि प्रेमाचा वर्षाव केला.
View this post on Instagram
यानंतर सुजैनने बॉयफ्रेंड अर्सलान, एक्स पती ऋतिक रोशन, भाऊ जायद खान, दोन्ही मुले आणि अनेक मित्रमैत्रिणींसह मिळून बर्थडे बॅश एन्जॉय केला.
सुजैनच्या बर्थडे सेलिब्रेशनचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये सुजैन केक कापताना बॉयफ्रेंड अर्सलानसोबत रोमँटिक होताना दिसत आहे.
सुजैनने अर्सलानला लिपलॉक केले. या दरम्यान तिचा एक्स पती ऋतिक रोशन मागे उभे राहून हसत होता. ऋतिकसोबत तिची गर्लफ्रेंड सबा आझादही दिसली. सुजैन आणि ऋतिक दोघांची मुलेही तिथे उपस्थित होते.