उर्दू शायरीतून दुनियेला भावूक करणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध शायर आणि गझलकार डॉ. बशीर बद्र यांचं गुरुवारी भोपाळ येथे निधन झाले आहे. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते डिमेंशिया (Dementia)आजाराने त्रस्त होते. प्रेम, विरह, आठवणी आणि आयुष्याच्या सूक्ष्म भावना साध्या पण हृदयस्पर्शी शब्दांत मांडणारे बशीर बद्र हे उर्दू साहित्यविश्वातील अत्यंत मानाचं नाव होतं. त्यांच्या शेरांनी अनेक पिढ्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्यांच्या काही ओळी आजही चाहत्यांच्या ओठांवर कायम आहेत— उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए...
१५ फेब्रुवारी १९३५ रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे जन्मलेल्या बशीर बद्र यांनी पुढे भोपाळला आपलं कायमस्वरूपी निवासस्थान बनवलं. त्यांनी उर्दू साहित्याला असंख्य अजरामर गझला दिल्या आहेत. त्यांच्या लेखणीतून नात्यांची ऊब, एकटेपणाची वेदना आणि आयुष्याचं तत्त्वज्ञान सहज उमटलं. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून सोशल मीडियावर चाहते आणि साहित्यप्रेमींकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.
नवी दिल्ली : हरित आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीच्या दिशेने भारताने मोठे पाऊल टाकले असून, देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणारी रेल्वेगाडी ...
एकेकाळी दंगलीत घर जळालं...
उर्दू शायरीच्या माध्यमातून प्रेमावर बोलणारे बशीर बद्र यांना १९८७ मध्ये मेरळमध्ये सांप्रदायिक दंगलीत द्वेषाचा सामना करावा लागला होता. या दंगलीत त्यांचं घर जळालं होतं. या दुर्घटनेत त्यांची अनेक ऐतिहासिक अप्रकाशित रचना आणि कविता कायमची जळून नष्ट झाली होती. या घटनेनंतर ते भोपाळला शिफ्ट झाले.
इंदिरा गांधींनी जुल्फिकार भुट्टो यांना ऐकवली बशीर बद्रांची कहाणी... बशीर बद्र यांनी भारताच्या फाळणीच्या वेळेसही अनेक शायरी लिहिल्या आहेत. शिमला करारादरम्यान तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानच्या जुल्फिकार अली भुट्टो यांना बशीर बद्र यांची फाळणीदरम्यान लिहिलेला शेर ऐकवला होता.
हा शेर असा होता...
दुश्मनी जमके करो लेकिन ये गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त बन जाएं तो शर्मिन्दा ना हों.
बशीर बद्र यांचे प्रसिद्ध शेर... मुसाफिर हैं हम भी मुसाफ़िर हो तुम भी किसी मोड़ पर फिर मुलाक़ात होगी
ज़िंदगी तू ने मुझे क़ब्र से कम दी है, ज़मीं पांव फैलाऊं तो दीवार में सर लगता है
उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए
सर झुकाओगे तो पत्थर देवता हो जाएगा, इतना मत चाहो उसे वो बेवफा हो जाएगा
कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से, ये नए मिज़ाज का शहर है ज़रा फासले से मिला करो
दुश्मनों के साथ भी मेरे ताल्लुक अच्छे हैं, मेरी फितरत में नफरत का कोई काम नहीं






