खालापूर टोलनाक्यावर आठ कोटींची चांदी जप्त

खोपोली : पिकअप टेम्पोंमधून जवळपास आठ कोटी चांदी एक्सप्रेसवेवरील खालापूर टोलनाक्यावर खालापूर पोलीस आणि भरारी पथकाने जप्त केली. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. विधानसभेच्या निवडणुकीत पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


एक्सप्रेसवरून एका गाडीतून मौल्यवान वस्तू घेऊन जात असल्याची गुप्त माहिती खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना मिळाल्यावर खालापूर टोलनाक्यावर संशयित पिकअप टेम्पो एमएच.०१.ईएम.८७७५ क्रमांकाच्या टेम्पोची तपासणी केली असता या टेम्पोमध्ये १७१ कुरिअर बॅगमध्ये जवळपास ८ कोटी रुपयांची चांदी जप्त करण्यात आली.


खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सचिन पवार सह इतर टीमने ही कारवाई केली.

Comments
Add Comment

कोल्हापुरमध्ये १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खेळता खेळता आला हृदयविकाराचा झटका, आईच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तहसीलमधील कोडोली गावात एक दुःखद घटना घडली, श्रावण

परदेशातही गणेशोत्सव उत्साहात

बाप्पाचा जयघोष आणि गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी भूमीवर भारतीय संस्कृतीचे दर्शन क्वालालंपूर: भारतातील

भक्ती मयेकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट: आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांचीही चौकशी, बारमधून महत्त्वाचा पुरावा जप्त

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील तिहेरी खून प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. मुख्य

प्रयागराजमध्ये गंगा नदीत तीन किशोरवयीन मुले बुडाली

प्रयागराज : प्रयागराज जिल्ह्यातील पुरामुफ्ती परिसरात आज गंगेत आंघोळीसाठी गेलेली तीन किशोरवयीन मुले बुडाली, असे

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे

बेकायदेशीर कत्तलीसाठी नेलेला जनावरांचा कंटेनर परभणीत जप्त, चालक ताब्यात

परभणी : पथरी-माजलगाव रस्त्यावरील पोखर्णी फाटा परिसरात बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा एक कंटेनर सतर्क