Nashik News : पावसाळ्यानंतरही नाशिककरांभोवती डेंग्यूचा विळखा कायम!

बाधितांचा आकडा हजारावर, १७ दिवसांतच ६६ नवे रुग्ण


नाशिक : पावसाळा संपल्यानंतरही डेंग्यूचा (Dengue) प्रकोप कायम असून, सातपूर विभागातील पाच वर्षीय बालकाचा रविवारी डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली. खासगी रुग्णालयाच्या अहवालानुसार, या बालकाला डेंग्यूचे निदान झाले होते. त्यामुळे वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला असून, वैद्यकीय विभागाच्या पथकाने या बालकाच्या घरी धाव घेत परिसरात औषध, तसेच धूरफवारणी केली. दरम्यान ऑक्टोबरच्या १७ दिवसांतच डेंग्यूचे ६६ नवे रुग्ण आढळले असून, बाधितांचा एकूण आकडा १,०३८ वर पोहोचला आहे.


पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात डेग्यू, स्वाइन फ्लु, चिकनगुनियासारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. जूनपासून डेंग्यू आजाराचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मेमध्ये या आजाराचे तब्बल ३३ नवे रुग्ण आढळले होते. जूनमध्ये डेंग्यूचे १६३ नवे रुग्ण आढळले, तर जुलैमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर या आजाराचे विक्रमी ३०७ रुग्ण आढळले होते. पावसाच्या पाण्याची ठिकठिकाणी साचलेली डबकी या आजाराच्या उद्रेकास कारणीभूत ठरली.


ऑगस्टमध्ये डेंग्यूचे १९८ नवे रुग्ण आढळले, तर सप्टेंबरमध्येही या आजाराची लागण झालेल्या नवीन रुग्णांचा आकडा १९८ इतकाच होता. पावसाळा आता परतीच्या मार्गावर असताना डेग्यूचा उद्रेक मात्र कायम राहिला आहे. २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरदरम्यान डेंग्यूचे ६६ नवे रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे एक जानेवारी ते १४ ऑक्टोबर या कालावधीतील डेंग्यू बाधितांचा एकूण आकडा आता १,०३८ वर पोहोचला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा डेंग्यूचा उद्रेक अधिक पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त राजगुरुनगर येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुणे : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

नाशिकमध्ये गाजत असलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस

अमरावती होणार उद्योगांचे नवे केंद्र! ५९० रुपयांत मिळणार जमीन

मुंबई : अमरावतीत अधिकाधिक उद्योग आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून, त्यासाठी अमरावतीत संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत

पुणे - पंचवीस जणांना मिळणार युरोपियन स्पेस सेंटरला भेट देण्याची संधी

पुणे : इस्रो आणि नासा भेटीचा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आता आणखी मोठी झेप घेणार आहेत.

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजांची २५ मार्चपासून ऑनलाईन नोंदणी

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व

Ashok Kharat case : पीडितांच्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास होणार गुन्हा दाखल

मुंबई : अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर पीडित महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल