Sunday, December 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी : IRS समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, तर पक्षही ठरला!

मोठी बातमी : IRS समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, तर पक्षही ठरला!

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी आहे, तर २६ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच एक अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या आणि अनेक दिवस चर्चेत असलेल्या अधिकाऱ्याची एंन्ट्री झाली आहे, IRS अधिकारी समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाच्या रिंगणात उतरणार आहेत. महायुतीकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. समीर वानखेडे मुंबईतील विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत.

आता हेच वानखेडे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून समीर वानखेडे निवडणूक लढवणार अशी शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वानखेडे निवडणूक रिंगणात उतरु शकतात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत या संदर्भात त्यांची बोलणी पक्का झाल्याची माहिती आहे. समीर वानखेडे राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना आयआरएस पदाचा राजीनामा द्यावा लागणार असून हा राजीनामा केंद्र सरकारच्या गृह विभागाला स्वीकारावा लागणार आहे. त्यानंतर राजकारणातील प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा अशी तीन पक्षांची मिळून महायुती आहे.

समीर वानखेडे या प्रकरणामुळे चर्चेत

समीर वानखेडे हे आयआरएस अधिकारी आहेत. अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) समीर वानखेडे मुंबई विभागाचे माजी संचालक आहेत. समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्स प्रकरणात कारवाई केली होती. आर्यन खानला वानखेडेंनी अटक केल्यावर त्याची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले होते.

कोण आहे समीर वानखेडे?

समीर वानखेडे हे ४४ वर्षीय २००८च्या बॅचचे आयआरएस इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस अधिकारी आहेत. मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे झोनल डायरेक्टर म्हणून २०२१ पर्यंत त्यांनी काम केले आहे. वानखेडे यांनी एनसीबीमध्ये रुजू होण्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एअर इंटेलिजन्स युनिटमध्ये काम केले होते. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत, वानखेडे यांनी अमली पदार्थांच्या अंमलबजावणीशी संबंधित कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. समीर वानखेडे हे छापे, गुप्तचर कारवाया आणि अंमली पदार्थांचे तस्कर आणि त्यांच्या नेटवर्कला लक्ष्य करून गुप्त तपास करण्यात सक्रियपणे सहभागी आहेत. आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत १७,००० किलो अंमली पदार्थ आणि १६५ किलो सोने त्यांनी जप्त केले आहे.

गायक मिका सिंहला मुंबई एअरपोर्टवर परदेशी करंन्सीसह समीर वानखेडे यांनी पकडलं होतं. त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमने अनुराग कश्यप, राम गोपाल वर्मासह विवेक ओबेरॉय, अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापे टाकले होते. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण मोठ्या प्रमाणावर बाहेर आली. समीर वानखेडे यांचं या सर्व कारवायांमागे दमदार नेतृत्व आहे. त्यांनी रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या सर्व मित्रांची चौकशी केली आहे. अनेक दिवस ते या प्रकरणांमुळे चर्चेत होते.

समीर वानखेडे अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती

मराठीमधील अभिनेत्री क्रांती रेडकरचे समीर वानखेडे हे पती आहेत. समीर वानखेडे यांनी २०१७ साली मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी दुसरा विवाह केला. त्यांना जुळ्या मुली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -