Tuesday, April 14, 2026

Chhattisgarh : वीज प्रकल्पात बॉयलरचा स्फोट, अनेकांचा मृत्यू

Chhattisgarh : वीज प्रकल्पात बॉयलरचा स्फोट, अनेकांचा मृत्यू

शक्ती : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात वेदांता कंपनीच्या वीज निर्मिती प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि १५ जण जखमी झाले. दुपारी ही दुर्घटना घडली.

सिंघीतराई गावातील वेदांता लिमिटेड कंपनीच्या वीज निर्मिती प्रकल्पात बॉयलर ट्यूबमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले. घटनेची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. शक्ती जिल्ह्याच्या प्रशासनाने दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. स्फोटानंतर आवश्यक ती खबरदारी घेऊन बॉयलरचे काम बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्फोट प्रकरणी चौकशी होणार असून दोषींवर नियमानुसार कारवाई होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

छत्तीसगडच्या शक्ती जिल्ह्यात वेदांता कंपनीच्या औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पात मंगळवार १४ एप्रिल २०२६ रोज दुपारी बॉयलर ट्यूबमध्ये स्फोट झाला. सिंघीतराई येथील कंपनीच्या युनिट १ बॉयलरमध्ये दुर्घटना झाली. दुर्घटना झाल्याची माहिती मिळताच मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणी कंपनी नियमानुसार पुढील कारवाई करेल, असे कंपनीच्या प्रशासनाने सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा