Sunday, January 19, 2025
Homeताज्या घडामोडीSanjay Narvekar : हातात कोयता अन् चेहऱ्यावर राग; नार्वेकर आता दिसणार 'इन...

Sanjay Narvekar : हातात कोयता अन् चेहऱ्यावर राग; नार्वेकर आता दिसणार ‘इन अ‍ॅक्शन मोड’!

‘रानटी’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : मराठी सिनेसृष्टीसह बॉलीवूडमध्ये (Bollywood) ‘देढ फुट्या’ या भूमिकेने लोकप्रिय असणारे अभिनेते संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) चाहत्यांना लवकरच अॅक्शन मोडमध्ये दिसून येणार आहेत. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ (Raanti) हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये संजय नार्वेकर अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना संजय नार्वेकर सांगतात, ‘सदा राणे’ हा वरकरणी अतिशय शांत पण आतून कपटी असा खलनायक साकारणे माझ्यासाठी चॅलेंजिंग होते. चित्रपटाच्या कथानकाला वळण देणारी ही भूमिका प्रेक्षकांनाही धडकी भरवणारी आहे. ‘कथेच्या गरजेनुसार भूमिकेत शिरणे माझ्यासाठी नेहमीच आव्हानात्मक असते. अशा भूमिका फार कमी लिहिल्या जातात, दिग्दर्शक समित कक्कड यांच्या ‘रानटी’ चित्रपटामुळे मला ‘सदा राणे’ या खलनायकाच्या व्यक्तिरेखेत प्रवेश करण्याची जबरदस्त संधी मिळाली आणि मी माझ्या पद्धतीने ती पडद्यावर साकारली आहे. समितच्या चित्रपटात काम करणे हा नेहमीच एक भन्नाट अनुभव असतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची कथा जबरदस्त असल्याने त्यात भूमिका करणे हे प्रत्येकासाठी चॅलेंजिंग असतं. प्रेक्षकांनाही हा ‘सदा राणे’ दीर्घकाळ लक्षात राहील याची मला खात्री वाटते.

कधी होणार प्रदर्शित?

दरम्यान, ‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम लाभलेली आहे. येत्या २२ नोव्हेंबर रोजी रानटी चित्रपट सर्व चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -