मुंबई : दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) लवकरच ‘वनवास’ या बॉलिवूड (Bollywood) चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अनिल शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहेत.
दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहेत. या शिवाय या चित्रपटात खुशबू सुंद, राजपाल यादव, सिमरत कौर यांसारखे कलाकार झळकणार आहेत.
झी स्टुडिओने इन्स्टाग्रामवर या चित्रपट संदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘कहानी जिंदगी की, कहानी जज्बात की. कहानी अपनों के विश्वास की’ या थीमवर हा चित्रपट आधारित असल्याचे समजतेय. अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगण्यात आलेली नाही.