Sunday, January 19, 2025
Homeताज्या घडामोडीSunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनिल केदार यांना चौकशीसाठी...

Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनिल केदार यांना चौकशीसाठी समन्स!

नागपूर : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी (Nagpur Bank Scam) काँग्रेसचे नेते सुनिल केदार (Sunil Kedar) यांना चौकशी समितीकडून समन्स बजावण्यात आला आहे. चौकशी अधिकारी न्या. जे. एन. पटेल यांनी सुनील केदार यांच्यासह संबधित पक्षकारांना समन्स बजावले आहेत. सदर चौकशी नागपूरच्या रवी भवन येथील सभागृहात होणार असून येत्या १४, १५, १६ आणि १७ ऑक्टोबरला स्वतः किंवा वकिलामार्फत चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

समन्समध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, पक्षकारांची चौकशीत स्वतःची बाजू मांडावी आणि बचाव करिता आवश्यक कागदपत्र सादर करावे. पक्षकार अनुपस्थित राहिल्यास चौकशीची कारवाई त्यांच्याशिवाय पूर्ण केली जाईल. तसेच ही चौकशी कोणत्याही परिस्थितीत तहकूब केली जाणार नसल्याचे या सांगितले आहे.

नेमके प्रकरण काय?

१९९९ साली सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकचे अध्यक्ष होते. त्यावेळी बँकेत असलेली रक्कम एका खाजगी कंपनीच्या सहाय्याने कोलकातामधल्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यात आली होती. मात्र सहकार विभागाचा कायद्यानुसार बँकेची परवागी न घेता बँकेची रक्कम दुसरीकडे गुंतवता येत नाही. या नियमाचे उल्लंघन करत रक्कम गुंतवली गेली होती. खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाली. त्यामुळे बँकत ठेवलेले शेतकऱ्याचे बँकेत ठेवलेले पैसेही बुडाले होते. न्यायालयाने दोषी सिद्ध ठरवत पाच वर्षांची शिक्षा १५० कोटी रुपयांच्या जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना आधीच नागपुरातील न्यायालयाने दोषी सिद्ध ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सध्या सुनील केदार त्याच प्रकरणी जामिनावर बाहेर आहेत. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार केदार यांच्याकडून घोटाळ्याची रक्कम व्याजासकट वसूल करण्यात यावी, या संदर्भातली सुनावणी सध्या सहकारमंत्र्यांसमोर सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -