Nitesh Rane : काँग्रेसने आरक्षण संपविण्याची भाषा केली तर तुमची ढाल बनून आम्ही उभे राहणार!

  103

आरक्षण बचाव रॅलीचे झाले भव्य सभेत रूपांतरय अनेक वक्त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा घेतला समाचार


'जय हिंद, जय भीम' चा नारा देत आमदार नितेश राणे यांनी आंबेडकरी जनतेची जिंकली मने


कणकवली : देशातील ज्या ज्या घटकाला संविधानाने आरक्षण दिलेले आहे ते त्यांचे हक्काचे आरक्षण आहे. हे आरक्षण काँग्रेस आणि त्यांच्या गठबंधन मधील पक्षांना आम्ही संपवू देणार नाही. जो पर्यंत या देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान (PM Narendra Modi) आहेत, देशात एनडीए (NDA) चे सरकार आहे. राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार आहे.तो पर्यंत आरक्षणाला हात लावण्याची हिंमत काँग्रेस (Congress) आणि त्याच्या मित्र पक्षांना करू देणार नाही. जेव्हा असे प्रयत्न होतील तेव्हा तुमची ढाल बनून आम्ही भाजपचे कार्यकर्ते, एनडीए गठबंधन मधील सर्वच कार्यकर्ते उभे राहू मात्र आरक्षण संपवू देणार नाही असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे कणकवली- देवगड- वैभववाडी चे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) व्यक्त केला.


गांधी घराण्याचे वारस, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी केलेल्या विधानानंतर त्याची दखल देशात घेणे गरजेचे आहे. काँग्रेसने कायमच डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्यावर अन्याय केला आहे. पंतप्रधान मोदी आरक्षणाचे संरक्षण करायला समर्थ आहेत. आरक्षण विरोधी बोलणाऱ्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे जे नेते उद्या प्रचाराला येतील त्यांना राहुल गांधींच्या आरक्षण संपवण्याच्या विधानाचा जाब विचारावा असे आवाहन भाजपा प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील आरक्षण बचाव रॅलीत केले. जय हिंद जय भीम चा नारा देत आमदार नितेश राणे यांनी आंबेडकरी जनतेची मने जिंकली.


भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, आरपीआय जिल्हाध्यक्ष रमाकांत जाधव, भाजपा एससी मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, भाजपा प्रवक्ते अंकुश जाधव, आरपीआय जिल्हाध्यक्ष अजित कदम,डॉक्टर मिलिंद कुलकर्णी,सदा ओगले, भाजपा जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव, चर्मकार समाज राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण,भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, माजी नगरसेवक गौतम कुडकर, मंडळ अध्यक्ष अजित कांबळे, विधानसभा मतदारसंघ प्रमुख मनोज रावराणे, माजी सभापती शारदा कांबळे, कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे, पडेल मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर, कणकवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर, शहर मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, वैभववाडी तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे, मानसी जाधव, राजेश चव्हाण, अजित तांबे, गौतम खुडकर, सुशील कदम शशांक ठाकूर, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. प्रस्ताविक अजित कांबळे तर सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले.


आरक्षण बचाव रॅलीचे मेळाव्यात रूपांतर झाल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून तसेच राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांच्या प्रतिमान समोर नतमस्तक होऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला माहिती असायला हवी की कोणत्या विचारला आपण मतदान करत आहोत. राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी विधान केले तेच जर पंतप्रधान मोदी यांच्याकडून झाले असते तर आज देशभरात गावागावात वाड्यावस्त्यांवर भाजपा आणि मोदींविरोधी रान उठवले असते. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा संविधान बदलणार अशा वावड्या उठवून बहुजन समाजाला फसवलं गेले. आता अशा भूलथापांना बळी पडू नका.


भाजपा चे सरकार आल्यावर संविधान बदलणार ह्या फसव्या प्रचारा वेळी मतदारांनी त्याचा पुरावा मागितला नाही. मागासवर्गीय जनतेला आपण काहीही सांगितले तरी ते आपल्यावर विश्वास ठेवतात ह्यामुळे आज राहुल गांधी विदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात.


आरक्षण बचाव रॅली तून घरी जाताना विचार करा की आरक्षणामुळे ग्रा.प. सदस्य,सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, नगरसेवक नगराध्यक्ष होण्याचा हक्क मागासवर्गीय आरक्षित जनतेला मिळाला आहे. जर काँग्रेसला आपण साथ दिली तर हे आरक्षण राहुल गांधी बंद करणार आहेत. जर राज्यात उद्या काँग्रेस विचारांचे सरकार आले तर आपल्या हक्काचे हे आरक्षण संपेल हे लक्षात घ्या. देशाला संविधान, राज्य घटना देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने कायम पाण्यात पाहिले. कायम बाबासाहेबांवर काँग्रेसने अन्याय केला. याउलट पंतप्रधान मोदी यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीला आणि संविधानाला मोठे करण्याचे काम केले. राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधात केलेले विधान आजवर नाकारले नाही. किंवा त्यांनी आपली चूक झाली अशी कबुली दिली नाही त्यामुळे उद्या जेव्हा काँग्रेसवाले, महाविकास आघाडीवाले प्रचाराला येतील तेव्हा त्यांना तुम्ही त्यांना जाब विचारा आणि आरक्षण रद्द करण्याचा राहुल गांधींच्या भूमिकेचे काय ? त्यांनी आजपर्यंत माफी का मागितली नाही हे विचारा.


आरक्षण बचाव रॅली काढण्यामागे मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जनतेमध्ये राहुल गांधींच्या आरक्षणीविरोधी भूमिकेबद्दल जनजागृती व्हावी हा उद्देश आहे. आज बौद्ध, चर्मकार, ठाकर, धनगर , आदिवासी, ओबीसी, मराठा,समाजाचे नेते या रॅलीत सहभागी झाले आहेत. आज उघडपणे आरक्षण विरोधी बोलणाऱ्या काँग्रेसची सत्ता आली तर ते आरक्षण संपवल्याशिवर राहणार नाहीत ही धोक्याची घंटा आहे ती ओळखा असे आमदार नितेश राणे यांनी आवाहन केले.

Comments
Add Comment

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक