मुंबई: महिला टी-२० वर्ल्डकप सुरू होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. गुरूवार ३ ऑक्टोबरपासून यूएईमध्ये या स्पर्धेची सुरूवात होत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ महिला टी-२० वर्ल्डकप जिंकण्यासाठी पक्का दावेदार मानला जात आहे. तसेच ते गतविजेतेही आहेत. तर भारतीय महिला संघ पहिल्या टी-२० वर्ल्डकप खिताब जिंकण्याच्या दृष्टीने मैदानात उतरतील.
महिला टी-२० वर्ल्डकप याआधी बांगलादेशात होणार होता. मात्र तेथील राजकीय अस्थिरता आणि अराजकतेमुळे ही स्पर्धा यूएईमध्ये स्थलांतरित करण्यात आली. भारतीय महिला संघ या स्पर्धेची सुरूवात ४ ऑक्टोबरपासून करत आहे. भारताचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध आहे. यानंतर ६ ऑक्टोबरला भारताचा सामना पाकिस्तानशी रंगणार आहे.
महिला टी-२० वर्ल्डकपमध्ये १० संघ भाग घेत आहेत. भारताच्या ग्रुप एमध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आहेत. दुसऱ्या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांग्लादेश आणि स्कॉटलंडचा समावेश आहे. स्पर्धेत एकूण २३ सामने होतील.
भारताचे वेळापत्रक
४ ऑक्टोबर भारत वि न्यूझीलंड, दुबई
६ ऑक्टोबर भारत वि पाकिस्तान, दुबई
९ ऑक्टोबर भारत वि श्रीलंका, दुबई
१३ ऑक्टोबर भारत वि ऑस्ट्रेलिया, शारजाह
१७ ऑक्टोबर सेमीफायनल दुबई
१८ ऑक्टोबर सेमीफायनल,शारजाह
२० ऑक्टोबर फायनल, दुबई