Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Pune Hit And Run : पोर्शे कार प्रकरणातील धनिकपुत्राला महाविद्यालयात अ‍ॅडमिशन मिळेना!

Pune Hit And Run : पोर्शे कार प्रकरणातील धनिकपुत्राला महाविद्यालयात अ‍ॅडमिशन मिळेना!

पुणे : विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुणे (Pune) शहरातील कल्याणीनगर परिसरात काही महिन्यांपूर्वी भीषण अपघात (Porsche Car Accident) घडला होता. पुण्यासह राज्यभरात खळबळ उडालेल्या या पोर्शे कार अपघात प्रकरणी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. हिट अँड रन प्रकरणातील पोर्शेचालक अल्पवयीन आरोपी मुलाला शिक्षणासाठी प्रवेश मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. मुलाने केलेल्या कारनाम्यांमुळे दिल्लीमधील एका शैक्षणिक संस्थेने कॉलेजमध्ये प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे या मुलाला शिक्षणात अनेक बाधा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा बारावी उत्तीर्ण आहे. त्याने दिल्लीमधील एका शैक्षणिक संस्थेत बीबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज केला होता, त्याला याठिकाणी प्रवेशही मिळाला. मात्र, अपघात प्रकरणात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळताच संस्थेने त्याला अॅडमिशन देण्यास नाकारले. या प्रकारानंतर मुलाच्या वकिलांनी याबाबतची तक्रार बाल न्यायमंडळाकडे दिली आहे. मुलाच्या शिक्षणात कोणतीही बाधा येऊ नये, अशी भूमिका अल्पवयीन आरोपी मुलाच्या वकिलांनी घेतली आहे.


दरम्यान, या अल्पवयीन आरोपी मुलाला प्रौढ घोषित करण्याच्या अर्जावर ४ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. मुलाला प्रौढ ठरविण्याबाबत पोलिसांनी बाल न्याय मंडळात (जेबीबी) अर्ज दाखल केलेला आहे.त्यावर अद्याप निकाल झालेला नाही. त्या अर्जावर पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला होणार आहे.

Comments
Add Comment