संजय राऊत यांना १५ दिवसांची कैद, जामीनावर मुक्त

मुंबई : मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक शौचालय बांधकाम करताना किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून सोमय्या दांपत्यानी उबाठा गटाचे खासदार संजय राजाराम राऊत यांच्यावर दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात माझगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना १५ दिवसांची कैद आणि २५ हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.


त्यानंतर लगोलग संजय राऊत यांच्याकडून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्यात आला. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. तसेच ३० दिवसांच्या आत वरच्या कोर्टात अपिल करून दाद मागण्याची मुभाही कोर्टाकडून देण्यात आली आहे.


मीरा-भाईंदर महापालिकेकडून मीरा-भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली. त्यापैकी १६ शौचालयं बांधण्याचं कंत्राट भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्र सादर करुन मेधा सोमय्या यांनी मीरा-भाईंदर पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना कोर्टात आव्हान दिलं होतं. या खटल्याचा निकाल सोमय्या यांच्या बाजूने लागला.

Comments
Add Comment

रुग्णांच्या आहाराची आता महापालिका घेणार अतिविशेष काळजी

दहा उपनगरीय रुग्णालयामध्ये आहार पुरवण्यासाठी मागवल्या निविदा आहार तज्ञांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच

दिवाळीपूर्वीच कोस्टल रोडच्या लगतची जळमटे केली साफ!

वरळीतील 'त्या' वाडीतील १६९ अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त मुंबई (खास प्रतिनिधी) : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती

महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ; माझगाव डॉक येथे दोन नौकांचे २७ ऑक्टोबर रोजी उद्घाटन

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ मिळणार आहे.

ईस्टर्न फ्रीवेसाठी मुंबईतील ३२० झाडे तोडणार!

मुंबई : घाटकोपर आणि ठाणे दरम्यानच्या ईस्टर्न फ्रीवे (महामार्ग) विस्ताराच्या कामाला मुंबई महापालिकेच्या (BMC)

दिवाळीच्या फटाक्यांमुळे तब्येतीला धोका!

मुंबई : दिवाळीमध्ये फटाक्यांची रोषणाई खूप छान दिसते, पण त्यामुळे हवेचे प्रदूषण खूप वाढले आहे. त्यामुळे

भायखळ्यातील ३५ बचत गटांना अशी झाली दिवाळीपूर्वी मदत

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावली निमित्त महिला बचत गटांनी बनवलेल्या फराळासह इतर वस्तूंच्या विक्रीसाठी मार्केट