पालघर(दीपक मोहिते): प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्या अधिकाराचा वापर करत पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी महाविद्यालये,शाळा,अंगणवाड्या व इतर शैक्षणिक संस्था आज बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.गेल्या तीन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे.
जिल्ह्यातील अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा,जिल्हा परिषद शाळा,नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा,सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तथापि,या कालावधीत सर्व मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे. उक्त आदेशाची अमंलबजावणी तात्काळ करण्यात यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.