Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीPhullwanti Movie Teaser : “प्रश्न नजरेचा आहे…”, प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनीच्या...

Phullwanti Movie Teaser : “प्रश्न नजरेचा आहे…”, प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनीच्या ‘फुलवंती’ चित्रपटाचा देखणा टीझर प्रदर्शित

मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आणि अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmir Mahajni) यांच्या ‘फुलवंती’ (Phullwanti) चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील पहिलं गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या गाण्याला मिळाला असून प्राजक्ताच्या सुंदर नृत्याचं कौतुक होतं आहे. ‘फुलवंती’ चित्रपटाचा टीझर आता प्रदर्शित झाला आहे. नेटकऱ्यांनी हा टीझर पाहून या अलौलिक कलाकृतीचं भरभरून कौतुक केलं आहे.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अभिनेत्री प्राजक्ता माळीने ‘फुलवंती’ चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर शेअर केलं होतं. तेव्हापासून ‘फुलवंती’ चित्रपटाविषयी अधिक चर्चा रंगू लागली. प्राजक्ता माळी आणि पॅनोरमा स्टुडिओज यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘फुलवंती’ चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ ही अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याआधी चित्रपटाचा देखणा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. संपूर्ण टीझर एकदम जबरदस्त झाला असून टीझरच्या शेवटच्या डायलॉगने सर्वांचंच लक्ष वेधलंय. ‘नाचात काहींना शौक दिसतो तर काहींना कला…प्रश्न नजरेचा आहे….नजर साफ असेल तर फुलवंती तुम्हाला दुर्गा दिसेल,” हा प्राजक्ताचा डायलॉग प्रचंड लक्षवेधी ठरला आहे.

चित्रपटाचे अप्रतिम सेट्स, दमदार ऐतिहासिक व्यक्तिरेखा, उच्च तांत्रिकमूल्ये त्याला तेवढ्याच धारदार संवादाची बरोबर अशा भव्यतेने येणारा ‘फुलवंती’ हा अतिशय देखणा चित्रपट प्रेक्षकांसाठी आणि प्राजक्ताच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाची अपूर्व पर्वणी ठरणार आहे. ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकटशास्त्री या दोघांची पेशवाई काळातील दमदार कथा असलेली, देखण्या कलाविष्काराने सजलेली ‘फुलवंती’ मराठी सिनेसृष्टीतील भव्यदिव्य, अविस्मरणीय कलाकृती ठरणार आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांना ‘फुलवंती’चा टीझर फारचं आवडला आहे. प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर ‘फुलवंती’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे. “विलक्षण आणि मनाला फुंकर घालणारा सुंदर चित्रपट आहे…यशाची आशा आहे”, “चित्रपट हीट होणार त्यात काही वाद नाही”, त्यामुळे उत्तम “कडक…खूपच भारी..नक्कीच सुपरहिट ठरणार”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -