टीव्ही विश्वातली नावाजलेली अभिनेत्री करिष्मा तन्ना आणि तिचा नवरा वरूण लवकरच आई बाबा होणार आहेत. नुकताच करिष्मा तन्नाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटात झाला. दाक्षिणात्य पद्धतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कुटुंबियांनी करिष्मा तन्ना आणि वरूणला भावी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले. या सोहळ्याचे निवडक फोटो करिष्मा आणि वरूणने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये करिष्मा आणि वरूण प्रचंड आनंदात दिसत आहेत.
Nashik Crime News: नाशिकरोड परिसरातील (Nashik Road Area) कारागृह अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर रात्री उशिरापर्यंत मद्यपार्टी रंगल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने ...
दाक्षिणात्य पद्धतीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी करिष्मा तन्नाने परंपरागत दाक्षिणात्य पोशाख केला होता. ती अतिशय सुंदर दिसत होती. करिष्माच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. वरुणनेही तिच्यासोबत मॅच करेल असा सुंदर पोशाख केला होता. दोघांचे दाक्षिणात्य पोशाखातले फोटो व्हायरल होत आहेत. करिष्मा तन्नाच्या डोहाळे जेवणाचे ठिकाण सुंदर फुलांनी सजवले होते. या ठिकाणाचेही फोटो व्हायरल होत आहेत.
मुंबई : महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई या नुतनीकृत वास्तूचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चर्नी रोड येथे करण्यात आले. ...
करिष्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांचा विवाह फेब्रुवारी २०२२ रोजी झाला. लग्नाला चार वर्षे झाल्यानंतर २०२६ मध्ये त्यांनी आई बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. आई (mom)आणि बाबा (dad) असं लिहिलेल्या आकर्ष टोप्या परिधान करून करिष्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांनी फोटो शेअर केला होता. करिष्मा प्रेग्नंट असल्याची घोषणा दांपत्याने सोशल मीडियावरून केली होती. मिळालेल्या माहितीनुसार करिष्मा - वरूण या दांपत्याच्या घरी ऑगस्ट २०२६ मध्ये चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सध्या करिष्माच्या डोहाळे जेवणाचीच सोशल मीडियात प्रचंड चर्चा आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यपाल नियुक्त आमदार इद्रीस नायकवाडी यांना पक्षनेतृत्वाने राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. ...






