लालबागच्या राजा चरणी साडेतीन किलो सोने, ६४ किलो चांदी, ५ कोटी १६ लाख रोख रक्कम

  71

मुंबई : लालबागचा राजा हा मुंबईतला प्रसिद्ध गणपती आहे. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागचा राजा गणपतीची ख्याती आहे. दरवर्षी लालबागच्या राजाच्या चरणी भरभरुन दान दिले जाते. हे वर्षही त्याला अपवाद नाही. दहा दिवसांमध्ये लालबागच्या राजाच्या चरणी पाच कोटी सोळा लाख रुपये रोख रक्कमेचे दान आले आहे. साडेतीन किलो सोने आणि ६४ किलो चांदी यावेळी लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात आली आहे.


लालबागच्या राजाच्या चरणी दरवर्षी भरभरुन दान भक्त करतात. तर या दानाची मंडळाकडून मोजदाद देखील करण्यात येते. लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेल्या सोने आणि चांदीचा लिलाव केला जातो. त्यामधून जी रक्कम जमा होते, त्यामाध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. तर राजाच्या चरणी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे दान भाविकांकडून केले जाते.


लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधीपासूनच भक्तांनी रांगेत उभे राहण्यास सुरुवात केली होती. तर यंदाही रोख रक्कम, सोने आणि चांदीचे भरभरुन दान करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी भाविकांकडून केलेल्या दानामध्ये ४२ लाख रुपयांची रोख रक्कमेची नोंद करण्यात आली. तर १९८.५५० ग्रॅम सोने आणि ५४४० ग्रॅम चांदीच्या वस्तू राजाच्या चरणी अर्पण करण्यात आल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी ६०, ६२, ००० रोख रक्कमेच्या दानाची नोंद करण्यात आली आहे. तर राजाला दुसऱ्या दिवशी १८३.४८० ग्रॅम सोन्याचे दान भाविकांकडून करण्यात आले आहे. तसेच ६,२२२ ग्रॅम चांदीच्या दानाची नोंद करण्यात आली.



अनंत अंबानींकडून २० कोटींचा मुकूट


पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जवळपास २० लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांसह अनेक बॉलिवूड कलाकार, राजकीय नेत्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. याच लालबागच्या राजाला अनंत अंबानी यांनी २० किलो सोन्याचा मुकूट भेट दिला होता. या मुकूटाची किंमत २० कोटी रुपये आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं त्याआधी राजाचा मुकूट काढून ठेवण्यात आला. हा सोन्याचा मुकूट आता लॉकरमध्ये ठेवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर