Sunday, October 6, 2024
Homeताज्या घडामोडीBMC Recruitment : बीएमसीकडून लिपिक पदावरील अट रद्द; काढणार नवी जाहिरात

BMC Recruitment : बीएमसीकडून लिपिक पदावरील अट रद्द; काढणार नवी जाहिरात

जाणून घ्या यापूर्वी अर्ज केलेल्यांनी काय करावे?

मुंबई : मुंबई महापालिकेने (BMC Recruitment 2024) कार्यकारी सहायक म्हणजेच लिपीक  पदासाठी (Clerk) १८४६ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार अर्ज करणारे उमेदवार पहिल्या प्रयत्नात दहावी उत्तीर्ण तसेच कला, वाणिज्य आणि विज्ञान यासह इतर शाखांमध्ये पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराला ४५ टक्के गुण मिळवणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र विद्यार्थ्यांनी या अटीला विरोध करत ही अट शिथिल करण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीनुसार बीएमसीने त्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

बीएमसीची लिपीक पदाच्या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ९ सप्टेंबर होती. अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना मुंबई महापालिकेने भरती प्रक्रिया स्थगित करत शैक्षणिक पात्रतेतील बदलाबाबतची अट बदलण्याचा निर्णय मान्य केल्याचं जाहीर केले आहे. त्याचबरोबर आता भरतीची नवी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेच्या अटीमुळे अर्ज भरता आले नव्हते ते विद्यार्थी अर्ज सादर करु शकणार आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली.

याआधी अर्ज केलेल्यांनी काय करावे?

सध्या लिपीक पदाच्या भरतीची नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. परंतु ज्या उमेदवारांनी या निर्णयाआधीच अर्ज सादर केले आहेत, त्यांनी पुन्हा अर्ज दाखल करण्याची आवश्यकता नाही, असे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -