Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीMukhyamantri Yojnadoot : मुख्यमंत्री योजनादूत'चा लाभ घेण्यासाठी 'या' तारखेआधीच करा अर्ज!

Mukhyamantri Yojnadoot : मुख्यमंत्री योजनादूत’चा लाभ घेण्यासाठी ‘या’ तारखेआधीच करा अर्ज!

जाणून घ्या वेतन, पात्रता आणि अर्ज पद्धत

मुंबई : राज्य सरकारने राज्यभरातील सर्व महिलांना सक्षम करण्यासाठी तसेच आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली. त्यानंतर लाडक्या भावांसाठीही मुख्यमंत्री योजनादूत (Mukhyamantri Yojnadoot) उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत तरुणांना महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीत नोकरीची (Job) संधी उपलब्ध होणार आहे, अशी घोषणा करण्यात आली होती.

त्यानुसार महाराष्ट्रात तब्बल ५०,००० योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे. याबबातची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. मात्र या उपक्रमाच्या अर्जासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२४ असून तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

कसा करावा अर्ज?

योजनादूत या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना अर्ज करु शकतात. तसेच उमेदवाराला www.mahayojanadoot.org या वेबसाइटवर नोंदणी करायची आहे. त्याचबरोबर उमेदवाराला वेबसाइटवर अर्ज केल्यानंतर ऑनलाइन अर्ज केलेली पत्र, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण कागदपत्रे, प्रमाणपत्रे, बँक खात्याचा पुरावा नियुक्तीच्या दिवशी सादर करणे आवश्यक आहे.

पात्रता आणि वेतन

योजनादूतसाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे महाराष्ट्राचा अधिवास प्रमाणपत्र असायला हवे. तसेच त्याला संगणकाचे बेसिक ज्ञान असणे गरजेचे आहे. योजनादूतांना १०,००० रुपये स्टायपेंड देण्यात येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -