गणपतीच्या मुहूर्तावर सिडकोची मेट्रो दरात ३३ टक्के कपात

तिकीट दर किमान १० तर कमाल ३० रुपये


नवी मुंबई : जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय असणाऱया नवी मुंबई मेट्रोचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा यासाठी सिडकोने बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये ३३ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ७ सप्टेंबरपासून मेट्रोचे सुधारित तिकीट दर लागू होणार आहेत. सुधारित दरांनुसार तिकीटाचा किमान दर १० रुपये तर कमाल ३० रुपये असणार आहे.


सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत मार्ग क्र.१ बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला आहे. या मार्गामुळे सीबीडी, तळोजा एमआयडीसी आणि सिडकोच्या खारघर येथील गृहसंकुलांना उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. या मार्गावर १७ नोव्हेंबर २०२३ पासून मेट्रो सेवा सुरु झाली असून या मेट्रोला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. नवी मुंबई मेट्रोचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा, तसेच नवी मुंबई मेट्रोकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सिडकोने बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये ३३ टक्क्यांपर्यंत लक्षणीय कपात केली आहे.


सुधारित तिकीट दरांमुळे जवळच्या तसेच लांबच्या अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही याचा फायदा होणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचे म्हणणे आहे.


नवी मुंबई मेट्रोच्या सुधारित दरांनुसार पहिल्या २ कि.मी. आणि २ ते ४ कि.मी. करिता १० रुपये तसेच पुढील ४ ते ६ कि.मी. आणि ६ ते ८ कि.मी. करिता २० रुपये, तर ८ ते १० कि.मी. च्या टफ्फ्यासह त्या पुढील अंतराकरिता ३० रुपये तिकीट दर लागू होणार आहेत. यापूर्वी, बेलापूर टर्मिनल ते पेंधर टप्प्याकरिता तिकिटांचा दर ४० रुपये इतका होता. हा तिकीट दर आता ३० असणार आहे.

Comments
Add Comment

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत