Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीRiteish Deshmukh Genelia D'souza Movie : रितेश-जेनेलियाची केमिस्ट्री पुन्हा झळकणार; तब्बल 21...

Riteish Deshmukh Genelia D’souza Movie : रितेश-जेनेलियाची केमिस्ट्री पुन्हा झळकणार; तब्बल 21 वर्षांनी ‘तुझे मेरी कसम’ पुन्हा एकदा रिलीज होणार

‘तुझे मेरी कसम’ पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर 

महाराष्ट्रातील सिनेप्रेमींचे लाडके दादा-वहिनी म्हणजेच रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुख (Genelia Deshmukh) या दोघांनी एकत्र काम केलेला पहिला चित्रपट ‘तुझे मेरी कसम’ पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. बॉलिवूडमध्ये रितेश देशमुखने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. तब्बल २१ वर्षांनी हा चित्रपट पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. अभिनेता रितेश देशमुखने आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली. १३ सप्टेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

काही जुने चांगले गाजलेले बॉलिवूड चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित केले जात आहेत. या प्रयोगाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून सिनेप्रेमी या चित्रपटांसाठी गर्दी करत आहेत. आता, ‘तुझे मेरी कसम’ हा रितेशचा पहिला चित्रपट पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. ‘तुझे मेरी कसम’ हा पहिला चित्रपट ३ जानेवारी २००३ रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता. कॉलेजवयीन तरुणाची प्रेमकथा यामध्ये दाखवण्यात आली होती. प्रेक्षकांची या चित्रपटाला चांगलीच पसंती मिळाली होती. त्याशिवाय, गाणीदेखील त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झालेली. या चित्रपटाचे निर्माते रामोजी राव हे होते. तर, ‘तुझे तेरी कसम’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी के. विजय भास्कर यांनी सांभाळली होती.

रितेश-जेनेलियासाठीही आहे खास चित्रपट

हा चित्रपट रितेश-जेनेलियासाठी खूप खास आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांमध्ये प्रेम जुळले होते. त्यानंतर दोघांनी जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटात रितेश देशमुख, जेनेलिया डिसुझा यांच्यासह सुप्रिया पिळगावंकर,
श्रिया सरन, सतीश शहा, सुषमा सेठ, शक्ती कपूर, असरानी, जसपाल भट्टी अशा आदींच्या भूमिका आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -