मुंबई: भारताची टेबल टेनिस खेळाडू अर्चना कामथने वयाच्या २४व्या वर्षी निवृत्ती घेत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या या खेळाडूने वयाच्या २४व्या वर्षी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या टॉप टेबल टेनिसपटूंपैकी एक अर्चना कामथने हा निर्णय अभ्यासासाठी घेतला आहे. तिला अमेरिकेत पुढील शिक्षण घ्यायचे आहे.
अर्चना कामथ पॅरिस ऑलिम्पिकच्या क्वार्टरफायनलपर्यंत पोहोचणाऱ्या भारतीय संघाची भाग होती. क्वार्टर फायनलमध्ये जर्मनीविरुद्ध भारताला केवळ एक विजय मिळवता आला होता. तो विजय अर्चनाच्या नावावर होता. दरम्यान, ती अभ्यासासाठी आता मिशिगन येथे पोहोचली आहे.
एका मीडियाशी बोलताना तिने सांगितले, मी प्रोफेशनल टेबल टेनिसमधून निवृत्ती घेण्याचे कारण अभ्यासाप्रती माझे प्रेम आहे. या निर्णयामागे आर्थिक कारण नाही. मला तर सरकार आणि चाहत्यांकडून अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे. अर्चना कामथने भारतीय संघाला पॅरिसमध्ये क्वार्टरफायनलपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
अर्चना टेबल टेनिस सोडण्यामागचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे २०२८मधील लॉस एजंलिसम्ये ऑलिम्पिक जिंकण्याची शक्यता कमी आहे. तिने पॅरिस ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर आपले कोच अंशुल गर्ग यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले की ,मी अर्चनाला म्हटले की पुढील ऑलिम्पिक मेडल जिंकणे कठीण आहे. ती अजूनही जगातील टॉप १० मध्ये सामील नाही आहे. खूप मेहनत करावी लागेल आणि गॅरंटीही नाही. मला वाटते अर्चनाने खेळ सोडण्याचा निर्णय आधीच घेतला होता. एकदा तिने निर्णय घेतला तर तो बदलणे कठीण आहे.
अर्चना कामथचा भाऊ नासामध्ये काम करते. अर्चना आपल्या भावाला आदर्श मानते. तिचे म्हणणे आहे की, तो माझा आदर्श आहे आणि मला अभ्यासासाठी तो नेहमी प्रेरित करतो. मला माझे शिक्षण पूर्ण करायचे आहे. टेबल टेनिसमधील १५ वर्षे खूप चांगली राहिली. आपल्या देशासाठी खेळण्याची संधी मिळणे यापेक्षा मोठा आनंद नाही.