मुंबई: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत असलेल्या ‘स्त्री-२’ (Stree 2) चित्रपटाचे चाहते प्रतिक्षेत होते. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला स्त्री हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटानंतर स्त्री २ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर गुरुवारी (१५ ऑगस्ट) रोजी सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटगृहात प्रदर्शित होताच ‘स्त्री २’ने बॉक्स ऑफिसला पछाडून सोडलेलं आहे. या चित्रपटाचं सात दिवसात बॉक्स ऑफिसवर अफलातून केलेल्या कमाईचं कलेक्शन समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी ‘स्त्री २’ने छप्परफ़ाड ओपनिंग केली. चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी श्रद्धा कपूरच्या चित्रपटाने तब्बल ५१.८ कोटींचा गल्ला कमावला. यंदाच्या वर्षामधला बॉलीवूडचा सर्वाधिक ओपनिंग करणारा ‘स्त्री २’ दुसरा सिनेमा ठरला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनांनतर दुसऱ्या दिवशी कमाईत घट झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, वीकेंडला या चित्रपटाने पुन्हा बॉक्स ऑफिस गाजवलं. सध्या बॉक्स ऑफिसवर केवळ स्त्री २ या चित्रपटाचच बोलबाला चालू असल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्या स्त्री २ (Stree 2) चित्रपटाची जादू सर्वत्र पाहायला मिळत आहे. श्रद्धा कपूर यावेळी या चित्रपटात चंदेरी गावावर आलेल्या संकटाचा अंत करण्यासाठी डायन बनून लढताना दिसत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट भलताच पसंतीस पडला आहे. स्त्री २ बॉक्स ऑफिसवर अनेक मोठ्या चित्रपटांना जबरदस्त स्पर्धा देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्त्री २ ने रिलीजच्या ८ व्या दिवशी सुमारे १६ कोटी रुपयांची अफलातून कमाई केली आहे.
स्त्री २ च्या कलेक्शनवर एक नजर
पेड प्रीव्यू ८ कोटी रुपये
१ दिवशी ५१.८ कोटी रुपये
२ दिवशी ३१.४ कोटी रुपये
३ दिवशी ४३.८५ कोटी रुपये
४ दिवशी ५५.९ कोटी रुपये
५ दिवशी ३८. १ कोटी रुपये
६ दिवशी २५.८ कोटी रुपये
७ दिवशी २० कोटी रुपये
८ दिवस १६ कोटी रुपये
आतापर्यंत एकूण कलेक्शन २९०.८५ कोटी रुपये
‘स्त्री २’ चे आतापर्यंतचे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Box Office Collection) पाहिल्यास चित्रपटाने भारतात २९०.८५ कोटीची धमाकेदार कमाई केली आहे. ६० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत जगभरात आपला ठसा उमटवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात ‘स्त्री २’ ने ४०० कोटींचा आकडा पार केला आहे.
स्त्री २ ने गदर २ ला दिली मात
१५ ऑगस्टला रिलीज झालेल्या हॉरर-कॉमेडी स्त्री २ ने पहिल्या आठवड्यात 8 दिवस बॉक्स ऑफिसवर अगदी धुमाकूळ घातली आहे. कमी बजेटमध्ये चित्रपट बनवण्यात आल्यामुळे भारतातील मोठ्या ब्लॉकबस्टरच्या यादीत स्त्री २ चा समावेश करण्यात आला आहे. तर स्त्री २ ने दुसऱ्या गुरुवारी १६ कोटी रुपयांची कमाई केली.
कमाईच्या बाबतीत स्त्री २ ने भला मोठा आकडा गाठल्यामुळे तो अफलातून कमाई केलेला आता पर्यंतचा चौथा हिंदी चित्रपट ठरला आहे. या यादीमध्ये शाहरुख खानच्या पठाण आणि जवान या चित्रपटांची नावे प्रथम आहेत. रणबीर कपूरचा ॲनिमल (Animal) चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सनी देओलच्या गदर २ (Gadar 2) चे नाव चौथ्या क्रमांकावर होते. पण आता मात्र त्याची जागा स्त्री २ या चित्रपटाने घेरली आहे. या वीकेंडला श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्त्री २५००० कोटींची कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.