Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीMardani 3 : ५ वर्षानंतर पुन्हा भेटणार आयपीएस शिवानी रॉय!

Mardani 3 : ५ वर्षानंतर पुन्हा भेटणार आयपीएस शिवानी रॉय!

यशराज फिल्मसकडून ‘मर्दानी ३’ ची घोषणा

मुंबई : सध्या सर्व सिनेसृष्टीत नवनवीन चित्रपटांबाबत घोषणा होत आहे. अशातच १० वर्षांपूर्वी यशराज फिल्मसकडून प्रदर्शित झालेल्या ‘मर्दानी’ चित्रपटाबाबतही नवीन अपडेट समोर आली आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेला मर्दानी चित्रपटाला चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. त्यानंतर २०१९ मध्ये या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित झाला होता. यशराज फिल्मसची (Yash Raj Films) निर्मिती असलेल्या ‘मर्दानी’ चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीची (Rani Mukerji) मुख्य भूमिका साकार केली होती. चित्रपटातील तिच्या डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेने प्रेक्षकांना वेड लावले होते. हे वेड पुन्हा लावायला आयपीएस शिवानी रॉय चाहत्यांच्या भेटीस (Mardani 3) येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘मर्दानी’च्या पहिल्या भागाला १०वर्ष पू्र्ण झाल्याच्या निमित्ताने आज यशराज फिल्मसने टीझरच्या माध्यमातून ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा केली. मात्र, या सिक्वेल भागाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आले नाही. मर्दानीच्या पहिल्या भागात अल्पवयीन मुलींची तस्करी, यामध्ये सहभागी असलेले राजकारणी यावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. तर, दुसऱ्या भागात स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालणारी वृत्ती, त्यांना नेहमीच पायाची धूळ समजणाऱ्या पुरुषसत्तावादी प्रवृ्त्तींवर भाष्य करण्यात आले होते. त्यानंतर आता ‘मर्दानी’च्या तिसऱ्या भागात कोणता विषय हाताळला जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

दरम्यान, या चित्रपटात आणखी कोणते कलाकार असणार, तसेच राणी मुखर्जी कोणत्या मोहिमेवर असणार याबाबत यशराज फिल्मसने कोणतेही भाष्य केले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -