Sunday, June 22, 2025

Neha Kakkarने पतीसोबतचा प्रायव्हेट व्हिडिओ केला शेअर, सोशल मीडियावर गोंधळ

Neha Kakkarने पतीसोबतचा प्रायव्हेट व्हिडिओ केला शेअर, सोशल मीडियावर गोंधळ

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. येथे ती आपला पती रोहनप्रीत सिंहसोबतचे व्हिडिओ शेअर करत असते. या व्हिडिओमध्ये तसेच फोटोंमध्ये नेहासोबतच रोहनप्रीतची केमिस्ट्री पाहण्यालायक असते. यावेळेस नेहाने जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात ती आपल्या पतीसोबत रोमँटिक होताना दिसत आहे.


नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह एक परफेक्ट कपलसारखे आहेत. दोघेही आपले प्रेम व्यक्त करण्यास अजिबात कचरत नाहीत. मात्र आता जो व्हिडिओ समोर आला आहे यावर युजर्सनी काही कमेंट्स केल्या आहेत.


 



 










View this post on Instagram























 

A post shared by Neha Kakkar (@nehakakkar)





नेहा कक्करने शेअर केला प्रायव्हेट व्हिडिओ


नेहा कक्करने आपले पती रोहनप्रीत सिंहसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. ते एका क्रूझवर आहेत आणि रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. नेहा रोहनप्रीतच्या मांडीवर डोके ठेवून पहुडलेली आहे आणि रोहनप्रीत शँपेन पीत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नेहाने लिहिले, मेरा सेफ प्लेस...यासोबतच नेहाने रोहनतप्रीतला टॅगही केले आहे.


या व्हिडिओच्या कमेंट्मध्ये रोहनप्रीतने लिहिले, हमेशा तेरे नाल खडा हूं. यासोबतच त्याने हार्ट इमोजीही बनवला आहे. या व्हिडिओवर अधिक युजर्स त्यांचे कौतुक करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा