मुंबई: हिंदू धर्मात रक्षाबंधनाचा सण अतिशय खास मानला जातो. हा स भावा-बहिणीच्या पवित्र संबंधाना दर्शवणारा आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि त्याच्याकडून सुरक्षेचे वचन घेते. दरवर्षी श्रावण महिन्यातील पोर्णिमा तिथीला हा सण साजरा केला जातो.
यावर्षी रक्षाबंधनाचा सण १९ ऑगस्टला येत आहे. रक्षाबंधनाचा सण अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे. मात्र तुम्हाला यामागचा इतिहास आणि महत्त्व माहित आहे का?
रक्षाबंधनाचा सण हा हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. पौराणिक कथानुसार महाभारतात कृष्णाचे बोट सुदर्शन चक्रामुळे तुटले होते. तेव्हा द्रौपदीने आपली साडी फाडून कृष्णाच्या बोटावर लावली होती. त्यादिवशी कृष्णाने द्रौपदीला तिची रक्षा करण्याचे वचन दिल् होते. जेव्हा वस्त्रहरणादरम्यान द्रौपदी लाचार होती सर्वांकडे मदतीची याचना करत होती तेव्हा भगवान श्रीकृष्णाने तिची मदत केली होती. तेव्हापासून प्रत्येक बहीण राखीपोर्णिमेच्या दिवशी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो.
राखीचे महत्त्व
शास्त्रात रक्षाबंधनाचा सण महत्त्वाचा आहे. भावा-बहिणीचे अतूट नाते दर्शवणारा हा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुसाठी प्रार्थना करते. तसेच भाऊही बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
शुभ मुहूर्त
राखीपोर्णिमेचा सण श्रावण महिन्यातील पोर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी १९ ऑगस्टला हा सण साजरा केला जात आहे. यासाठीचा शुभ मुहूर्त दुपारी १.३२ वाजल्यापासून ते रात्री ९.०७ वाजेपर्यंत राहील.