Har Ghar Tiranga : 'तिरंगा सेल्फी' उपक्रमाला सुरुवात; सर्व इमारती व घरांवर तिरंगा लावण्याचे आवाहन!

पुणे : उद्या म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा करण्यात येणार आहे. केंद्र शासनाकडूनही (Central Government) दरवर्षी ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) उपक्रम राबवण्यात येतो. त्याचप्रमाणे यंदाही शासनातर्फे देशभरात १३ ते १५ ऑगस्टया कालावधीत दरवर्षीप्रमाणे ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय इमारती तसेच पुणे विभागातील नागरिकांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.


'घरोघरी तिरंगा' या उपक्रमानुसार प्रत्येक देशवासीयांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन आपला देशाभिमान व्यक्त करण्यासह स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करावे, असे आवाहन केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.


हा उपक्रम राबवित असताना प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयाने १३ ते १५ ऑगस्टदरम्यान सूर्योदयानंतर राष्ट्रध्वज फडकावणे आणि सूर्यास्तापूर्वी उतरवणे बंधनकारक आहे. नागरिकांनी आपल्या घरी लावलेला राष्ट्रध्वज या संपूर्ण कालावधीत संध्याकाळी उतरवणे आवश्यक नाही. राष्ट्रध्वज संहितेचे पालन करुन या कालावधीत राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा.


दरम्यान, 'तिरंगा सेल्फीज' हा उपक्रम राबवून सदर छायाचित्रे शासनाच्या https://harghartiranga.com संकेतस्थळावर अपलोड करावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कळविले आहे. सर्व नागरिकांनी ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमात सहभागी होत आपल्या घरी फडकविलेल्या राष्ट्रध्वजासोबत सेल्फी घेऊन कार्यालयप्रमुखांकडे पाठवावे.

Comments
Add Comment

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या