Monday, February 10, 2025
Homeक्रीडाऑलिम्पिक २०२४Vinesh Phogat : विनेश फोगटसाठी हरिश साळवे उतरले मैदानात!

Vinesh Phogat : विनेश फोगटसाठी हरिश साळवे उतरले मैदानात!

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) अपात्र केलेल्या भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) हिला न्याय मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे (Harish Salve) आता मैदानात उतरले आहेत. विनेश फोगटच्या अपात्रतेविरोधातील याचिकेवर आज (दि.९) सुनावणी होणार असून, ज्येष्ठ वकील हरीश साळवे विनेश फोगटची बाजू मांडणार आहेत.

हरीश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या वतीने कुलभूषण जाधव यांचा खटला लढवला होता. त्यात पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले. कुलभूषण यांची केस लढताना साळवे यांनी फक्त एक रुपया फी घेतली होती. आता तेच साळवे कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) मध्ये विनेश फोगटसाठी बाजू मांडणार आहेत.

हरीश साळवे यांनी १९९९ ते २००२ दरम्यान भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम केले आहे. महागड्या वकिलांमध्ये साळवे यांची गणना होते. मात्र, काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या खटल्यात त्यांनी केवळ एक रुपया एवढी फी आकारली होती. आयसीजेमध्ये साळवे यांनी केलेल्या युक्तिवादानंतर पाकिस्तानची बोलती बंद करत पाकिस्तानच्या तुरुंगात बंदी असलेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली होती.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्याला काही तास उरलेले असतानाच अवघे १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने विनेश फोगटला अपात्र घोषित करण्यात आले. हा कोट्यवधी भारतीयांना मोठा धक्का होता. या धक्क्यातून भारतीय चाहते सावरत नाही तोच निराश झालेल्या विनेशने कु्स्तीतून थेट निवृत्तीच जाहीर करून टाकली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -