मुंबई: नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकत सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय ट्रॅक अँड फिल्ड खेळाडू बनला आहे. दरम्यान, या सामन्यात सुवर्णपदक मिळवत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिकमध्ये नवा रेकॉर्ड केला आहे. या निकालानंतर नीरज चोप्राच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या म्हणाल्या. ज्याने गोल्ड मेडल आणले तो ही आपलाच मुलगा आहे.
पानिपतमध्ये राहणाऱ्या नीरज चोप्राची आई सरोज देवी म्हणाला, आम्ही खूप आनंदी आहोत. आमच्यासाठी रौप्य पदकही सुवर्णपदकासारखेच आहे. ज्याने गोल्ड आणले तोही आमचाच मुलगा आहे. मेहनत करून तो घेऊन गेला. प्रत्येक खेळाडूचा दिवस असतो. नीरज दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याच्या कामगिरीने खुश आहोत. जेव्हा तो येईल तेव्हा त्याच्या आवडीचे जेवण बनवेन.
#WATCH | Haryana: On Neeraj Chopra winning a silver medal in men’s javelin throw at #ParisOlympics2024, his mother Saroj Devi says, “We are very happy, for us silver is also equal to gold…he was injured, so we are happy with his performance…” pic.twitter.com/6VxfMZD0rF
— ANI (@ANI) August 8, 2024
याशिवाय रौप्य पदक जिंकल्यावर नीरज चोप्राचे वडील सतीश कुमार यांचेही विधान समोर आले आहे. ते म्हणाले, आपण दबाव टाकू शकत नाही. प्रत्येक खेळाडूचा दिवस असतो. आज पाकिस्ताी खेळाडूचा दिवस होता. अर्शदने गोल्ड जिंकले.