MLA disqualification case : ठाकरेंचे आमदार अपात्र ठरवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेची हायकोर्टात धाव!

  111

केली तातडीच्या सुनावणीची मागणी


मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही गटांचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला होता. राहुल नार्वेकरांनी बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला. तर दोन्ही पक्षांच्या आमदारांपैकी कोणालाही अपात्र ठरवले नाही. त्यामुळे ठाकरे गटाने (Thackeray Group) या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली तर शिवसेनेनेही ठाकरे गटाचे आमदार का अपात्र ठरवण्यात आले नाहीत, याबाबत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता या प्रकरणी शिवसेनेने मुंबई हायकोर्टाला (Mumbai Highcourt) तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली आहे.


शिवसेनेचे वकील भरत गोगावले यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आमदारांचा कार्यकाल संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती गोगावलेंनी याचिकेत केली आहे. आमदारांचा कार्यकाल सप्टेंबरअखेरीस संपत आहे. त्यामुळे न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून ६ ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. मात्र शिवसेना उध्दव ठाकरे गटाने तातडीच्या सुनावणीवर आक्षेप आहे.



काय म्हटले आहे याचिकेत?


विधानसभा अध्यक्षांचा निर्णय मनमानी, बेकायदा आणि असंविधानिक आहे. रेकॉर्डवर सादर करण्यात आलेले पुरावे विधानसभा अध्यक्षांनी विचारात घेतले नाहीत. इतकेच काय तर ठाकरे गटातील आमदारांनी स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले होते, हे लक्षात घेण्यात विधानसभा अध्यक्ष अपयशी ठरले, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे सात महिन्यांनंतर तातडीच्या सुनावणीचा आग्रह का केला जातोय? असे म्हणत उध्दव ठाकरे गटाचे वकील विनयकुमार खातू यांनी आक्षेप नोंदवला आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही