पुणे : पुण्यामध्ये (Pune news) पावसाने हाहाकार (Heavy rainfall) माजवला आहे. अतिवृष्टीमुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातच पुण्याच्या लवासामधून एक दुर्घटना समोर आली आहे. लवासा हिल स्टेशनवर तीन बंगल्यावर दरड कोसळली (Lavasa Landslide). या घटनेमध्ये २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिमुसळधार पावसामुळे लवासा हिल स्टेशन येथे दरड कोसळली. यामुळे दोन बंगले ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून यात २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत. घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाला माहिती देऊनही अद्याप कोणीही मदतीसाठी न पोहोचल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पुणे जिल्ह्यात मागील २४ तासांत मुसळधार पाऊस पडला असून लवासा या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजेच ४५३.५ मिली मिटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळेच या ठिकाणी दुर्घटना घडून नागरिकांना मोठा फटका बसला आहे. पुण्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशामध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…