Monday, May 12, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजठाणे

Dombivali News : संरक्षक कठड्यावर बसलेल्या महिलेचा खाली पडून मृत्यू - पाहा व्हिडिओ

Dombivali News : संरक्षक कठड्यावर बसलेल्या महिलेचा खाली पडून मृत्यू - पाहा व्हिडिओ

मस्करीची कुस्करी झाली आणि जीवावर बेतली!


डोंबिवली : संरक्षक कठड्यावर बसलेल्या महिलेची मित्रासोबत मस्करी सुरू असताना त्या महिलेचा इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली-कल्याण शीळ रोड परिसरात घडली. नगीनादेवी मंजिराम असे या महिलेचे नाव असून ती या इमारतीमध्ये सफाईचे काम करायची.


डोंबिवली पूर्व कल्याण शीळ रोडवर विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे. या इमारतीमधील एका कार्यालयात नगीनादेवी मंजिराम ही महिला साफसफाईचे काम करते. नगीनादेवी डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात राहते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.





मंगळवारी दुपारच्या सुमारास नगीनादेवी तिच्या सहकाऱ्यांसोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्याजवळ बसली होती. ती बसली असताना तिचा सहकारी तिच्यासोबत मस्करी करीत होता. याच दरम्यान तिच्या सहकाऱ्याचा हात तिला लागला आणि त्याचा तोल गेला आणि होत्याचे नव्हते झाले. याचवेळी तिच्यासोबत मस्ती करणारा बंटी नावाच्या तरुणाचाही तोल गेला, मात्र त्याला आजूबाजूला उभे असलेल्या लोकांनी वाचवले.


या प्रकरणाची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment