छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची येत्या १३ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शांतता रॅली (Shantata Rally) निघणार आहे. सगेसोयरेच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याच्या मागण्यांसाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. या महाशांतता रॅलीची जय्यत तयारी सुरु झाली असून प्रशासन देखील कामाला लागले आहे. रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांची महाशांतता रॅली शनिवारी १३ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरात पार पडणार आहे. या रॅलीसाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. सकाळी ११ वाजता संभाजीनगरच्या सिडको येथील वसंतराव नाईक चौकातून या रॅलीला प्रारंभ होणार आहे. तर क्रांती चौक येथे या रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीमध्ये १०० वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ४००० पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्यासोबत मराठा बांधव देखील या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील महाशांतता रॅलीसाठी मुख्य वर्दळीचा मार्ग असलेला जालना रोड सुमारे ८ ते ९ तासांसाठी बंद राहणार आहे. दरम्यान या रॅलीमध्ये पोलिसांचे विशेष लक्ष असणार असून रॅलीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून समन्वयकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
लाखोच्या संख्येने समाज बांधव जिल्हाभरातून या रॅलीत सहभागी होणार आहेत. या सर्वांसाठी चहा, नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था रॅली मार्गावर करण्यात आली आहे. तसेच रॅलीच्या मार्गावर सहभागी समाज बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक, ॲम्ब्युलन्स, फिरती स्वच्छतागृहे ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रॅलीदरम्यान कोणाला उपचाराची गरज भासली तर अत्याधुनिक १० ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि अनुभवी नर्स औषधोपचारासह सज्ज असणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील रॅलीदरम्यान मनोज जरांगे यांच्यासाठी क्रांती चौक येथे भव्य स्टेज उभारण्यात येणार आहे. तसेच विविध गावात आणि तालुक्याच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बैठका घेत आहेत. यामध्ये हजेरी लावणाऱ्या समाज बांधवांसाठी विविध ठिकाणी वाहन पार्किंगची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. पैठण तालुक्यातून येणाऱ्यांसाठी बीड बायपास रोडवरील जबिंदा मैदान, कन्नड, खुलताबाद, वैजापूर तर गंगापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी कर्णपुरा, अयोध्या मैदान येथे, तर फुलंब्री आणि सिल्लोड येथील समाज बांधवांची वाहने जाधववाडी (नवा मोंढा) येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…