पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत महागडी पोर्शे कार चालवत दोन तरुणांना चिरडल्याच्या बातमीने (Pune porsche accident) अख्खा महाराष्ट्र हादरला होता. हा मुलगा पुण्यातील धनिक बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांचा मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कशी कामाला लागली होती, याची वारंवार उदाहरणे समोर येत होती. झालेल्या घटनेवर ३०० शब्दांचा निबंध लिहून देण्याच्या अटीवर त्याचा जामीन मंजूर झाल्याने तर देशभरात संतापाची लाट उसळली होती. अखेर या घटनेच्या दोन महिन्यांनंतर धनिकपुत्राने हा निबंध लिहून सादर केला आहे.
पुण्यातील अपघातानंतर आरोपी अल्पवयीन मुलाची अवघ्या १५ तासात सुटका झाली होती. अल्पवयीन धनिकपुत्राची काही दिवसापूर्वी बालसुधारगृहातून सुटका करण्यात आली. सुटका करताना ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यासारख्या अन्य काही किरकोळ अटींवरुन त्याला जामीन मिळाला आणि त्यानंतर सर्व स्तरांतून संताप व्यक्त करण्यात आला.
या निबंधामध्ये अपघात घडल्यानंतर काय करायला हवे किंवा अपघात घडू नये म्हणून स्वत: काय काळजी घ्यावी या पद्धतीचा निबंध लिहिणे आवश्यक होते. बालनिरीक्षणगृहातून बाहेर पडल्यानंतर अखेर अल्पवयीने मुलाने ३०० शब्दांचा निंबध बालहक्क मंडळकडे वकिलांच्यामार्फत सादर केला आहे.
अल्पवयीन आरोपी मुलाला वाचवण्यासाठी त्याचे आई-वडील तसेच आजोबांनी अनेक कारनामे केल्याचे तपासातून उघडकीस आले. अल्पवयीन मुलाच्या हातात कार देण्यासाठी वडील तुरुंगात आहेत, तर अपघात झाला त्यावेळी मुलगा गाडी चालवतच नव्हता ड्रायव्हर चालवत होता असं वदवून घेण्यासाठी ड्रायव्हरला जबरदस्ती केल्याप्रकरणी आजोबा तुरुंगात आहेत. मुलाच्या आईनेही भयंकर गुन्हा केला. आपल्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांत अल्कोहोल आढळेल याकरता तिने ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांच्या मदतीने स्वतःच्या रक्ताचे नमुने मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांसोबत अदलाबदली केले. त्या दोन डॉक्टरांवरही कारवाई करण्यात आली. सध्या हे तिघेही तुरुंगात आहेत.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…