केजरीवालांचा ‘तिहार’मधील मुक्काम ३ जुलैपर्यंत वाढला

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नियमित जामीन याचिकेवर राऊस अव्हेन्यू कोर्टात (Rouse Avenue Court) आज सुनावणी झाली. यावेळी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे.


लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून २१ दिवसांचा अंतरिम जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर जामीन मिळावा यासाठी पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र, केजरीवाल यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आज अरविंद केजरीवाल आणि विनोद चौहान यांची न्यायालयीन कोठडी संपत होती. त्यामुळे दोघांनाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.


मात्र, यावेळी अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. त्यानंतर राऊस एव्हेन्यू येथील विशेष पीएमएलए न्यायालयाने केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडी वाढ केली.


विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती विंदू यांच्या न्यायालयात आजची सुनावणी झाली. ईडीच्या वतीने एएसजी एसव्ही राजू आणि केजरीवाल यांचे वकील विक्रम चौधरी न्यायालयात उपस्थित होते. दोघांनीही आपापल्या बाजूने युक्तीवाद केला. सुनावणीदरम्यान, सीएम अरविंद केजरीवाल यांच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने त्यांच्या न्यायालयीन कोठडी वाढवण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या याचिकेला विरोध करत केजरीवाल यांची कोठडी वाढवण्यासाठी कोणताही आधार नाही, असा युक्तीवाद केला. तर ईडीच्या वकिलाने सांगितले की, विनोद चौहान यांनी गोवा निवडणुकीसाठी के कविता यांच्या पीएकडून अभिषेक बोईनपल्ली यांच्यामार्फत २५ कोटी रुपये घेतले होते. हे दोन्ही युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने न्यायालयीन सुनावणीत वाढ केली.


मद्य घोटाळ्याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, राजधानीतील दारू व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बदल्यात पंजाबमधील व्यावसायिकांकडूनही लाच घेण्यात आली होती. त्यांनी असेही म्हटले होते की, आम आदमी पार्टी (आप) ची सत्ता असलेल्या पंजाबमधील ज्या व्यावसायिकांनी लाच दिली नाही त्यांना शेजारच्या राज्यात दारूच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची परवानगी नव्हती.


दरम्यान, पदावर असताना अटक होणारे अरविंद केजरीवाल हे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यांचे साथीदार मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनाही अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा

गॅस पुरवठ्याबाबत केंद्राचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली: पश्चिम आशियामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून, त्याचे पडसाद

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं