Pune crime : धक्कादायक! पुण्यातील बिल्डरने स्वतःवरच झाडल्या गोळ्या

Share

सुसाईड नोट नव्हे तर सापडला हिशोबांचा कागद

पुणे : पुण्यात धक्कादायक गुन्हेगारी घटना (Pune crime) घडण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कधी गोळीबार, कधी कोयता गँगची दहशत, खूनखराबा यांमुळे पुणे पार हादरुन गेलं आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना पुण्याच्या नऱ्हे परिसरात घडली आहे. पुण्यात एका तरुण बांधकाम व्यावसायिकाने स्वतःच्या कार्यालयात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या (Suicide case) केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

फ्लॅट आणि प्लॉट विक्री तसेच खरेदी करणाऱ्या एक ३१ वर्षीय बिल्डर तरुणाने पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील नऱ्हे येथील त्याच्या कार्यालयात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. मयूर सुनील नरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मयूर हा जांभुळवाडी परिसरात कुटुंबासोबत राहत होता. तो विवाहित होता. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयूरचे नऱ्हे येथील गावगाडा हॉटेलच्या शेजारील इमारतीत चौथ्या मजल्यावर ऑफिस होते. मयूर रविवारी रात्री घरीच आला नाही. त्यामुळे त्याचा भाऊ त्याच्या कार्यालयात पोहोचला. यावेळी मयूरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं दिसून आलं. लागलीच ही माहिती सिंहगड रोड पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार व सहाय्यक निरीक्षक यादव व पथकाने घटनास्थळी पोहोचले. मयूरने आत्महत्या का केली, याचं कारण समजू शकलेलं नाही.

मयूरजवळ सुसाईड नोट आढळून आलेली नाही, मात्र त्याने आत्महत्येपूर्वी काही हिशोब कागदावर लिहून ठेवला. त्याचबरोबर कोणाकडून किती पैसे येणे आहे, ती कोणाला किती देणे आहे, अशी माहिती असल्याचे सहाय्यक निरीक्षक यादव यांनी सांगितले. मयूरच्या आत्महत्येने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच जांभुळवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Recent Posts

श्रीलंका दौऱ्यापासून भारताचा नवा प्रशिक्षक रुजू

जय शहा यांची माहिती नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण? या…

55 mins ago

Test match : भारतीय महिलांचा दणदणीत विजय

कसोटी सामन्यात द. आफ्रिकेवर दहा विकेट्स राखून सरशी चेन्नई (वृत्तसंस्था) : शफाली वर्माचे द्विशतक (२०५…

2 hours ago

संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे, ही गंभीर बाब

पंतप्रधान मोदींची राहूल गांधींवर टीका नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांचे वक्तव्य गंभीर…

2 hours ago

मेधा पाटकर यांना ५ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

मानहाणी प्रकरणी साकेत न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मानहाणी प्रकरणी…

2 hours ago

पुण्यात आढळला झिकाचा पाचवा रुग्ण

पुणे : एरंडवणेतील गणेशनगरमधील २८ वषीय गर्भवतीला लागण झाल्याने झिकाचा संसर्ग इतरत्र पसरल्याचीही भीती व्यक्त…

4 hours ago

दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगला स्थगिती

देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा! मुंबई : दीक्षाभूमी परिसरात चालू असलेल्या भूमिगत पार्गिंकच्या कामाला आंबेडकरी अनुयायांकडून…

5 hours ago