Saturday, July 13, 2024
Homeक्रीडाWI vs Uganda:टी-२० वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजचा प्रचंड विजय, युगांडाला ३९ धावांवर केले...

WI vs Uganda:टी-२० वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजचा प्रचंड विजय, युगांडाला ३९ धावांवर केले ऑलआऊट

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup 2024) वेस्ट इंडिज आणि युगांडा यांच्यात ९ जूनला सामना रंगला आहे. गयानाच्या प्रोव्हिडेन्स स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने युगांडाला खूपच मानहानीकरक पद्धतीने हरवले.

या सामन्यात वेस्ट इंडिजने पहिल्यांदा खेळताना ५ बाद १७३ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरासाठी मैदानात खेळण्यासाठी उतरलेल्या युगांडाचा नवखा संघ अवघ्या ३९ धावांवर आटोपला. या पद्धतीने वेस्ट इंडिजने तब्बल १३४ धावांनी विजय मिळवला.

वेस्ट इंडिजच्या विजयाचे हिरो ठरला अकील हुसैन. त्याने ११ धावांमध्ये ५ बळी मिळवले. अकीलची ही कामगिरी टी-२० वर्ल्डकपमधील कोणत्याही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांपेक्षा सरस आहे.

तर युगांडाच्या संघाने टी-२० वर्ल्डकपमधील लाजिरवाण्या रेकॉर्डशी बरोबरी केली. दरम्यान, ३९ धावांवर ऑलआऊट होणाऱ्या नवख्या संघाने रेकॉर्डशी बरोबरी केली. टी-२० वर्ल्डकपमध्ये २४ मार्च २०१४मध्ये नेदरलँड्सच्या संघाने श्रीलंकेविरुद्ध ३९ धावा केल्या होत्या.

हा वेस्ट इंडिजचा सर्व टी-२० आंतरराष्ट्रीयमधील सर्वात मोठा विजय आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -