Monday, June 8, 2026

French Open 2026: अलेक्झांडर झ्वेरेव्हचा ऐतिहासिक विजय; फ्रेंच ओपन 2026 चे पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले

French Open 2026: अलेक्झांडर झ्वेरेव्हचा ऐतिहासिक विजय; फ्रेंच ओपन 2026 चे पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले

जर्मनी : जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने (Alexander Zverev) फ्रेंच ओपन २०२६ स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकत आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात त्याने इटलीच्या फ्लाविओ कोबोलीचा पाच सेटपर्यंत रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला. (French Open 2026)

रोलँड गॅरोस येथे झालेल्या अंतिम सामन्यात झ्वेरेव्हने ६-१, ४-६, ६-४, ६-७ (५), ६-1 अशा फरकाने विजय मिळवला. जवळपास चार तास चाललेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मात्र निर्णायक सेटमध्ये झ्वेरेव्हने आपला अनुभव आणि संयम दाखवत बाजी मारली.

या विजयासह झ्वेरेव्ह फ्रेंच ओपन जिंकणारा पहिला जर्मन पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी तो तीन वेळा वेगवेगळ्या ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र प्रत्येक वेळी त्याला निराशा पत्करावी लागली होती. त्यामुळे या यशाला त्याच्यासाठी विशेष महत्त्व आहे.

विजयानंतर झ्वेरेव्ह भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. सामना संपताच तो कोर्टवरच खाली बसला आणि आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर त्याने कुटुंबीयांची भेट घेत हा खास क्षण साजरा केला.

यंदाच्या स्पर्धेत झ्वेरेव्हला विजेतेपदाचा प्रमुख दावेदार मानले जात होते. अनेक दिग्गज खेळाडू स्पर्धेबाहेर गेल्यानंतर त्याने अपेक्षांवर खरा उतरत विजेतेपद पटकावले.

दरम्यान, महिला एकेरीत १९ वर्षीय रशियन खेळाडू मीरा आंद्रीवा हिने विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात तिने माजा च्वालिंस्का हिचा पराभव करून आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकले.

फ्रेंच ओपन ही टेनिसमधील चार प्रमुख ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी एक मानली जाते आणि दरवर्षी रोलँड गॅरोस येथे आयोजित केली जाते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >