Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीNarendra Modi : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू!

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू!

दिग्गज नेत्यांसह ‘या’ लोकांचीही लागणार हजेरी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Loksabha Election Result 2024) देशात एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्या टर्ममध्ये शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत. मोदींची ही हॅटट्रिक असून हा शपथविधी (Swearing in ceremony) भव्य व्हावा यासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता शपथविधी सोहळा संपन्न होणार असून यामध्ये दिग्गज नेत्यांसह काही महत्त्वाच्या लोकांचीही हजेरी लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी राष्ट्रपती भवनात ८००० पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला दक्षिण आशियाई देशातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, नेपाळचे पंतप्रधान पुष्पा कमल दहल प्रचंड, भुटानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि मॉरिशसनचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथही आपली उपस्थिती दर्शविणार आहेत.

त्याचबरोबर दिग्गज नेत्यांसह शपथविधीसाठी सफाई कर्मचारी, तृतीयपंथी आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांची उपस्थिती असणार असल्याचे सांगितले जाते. वंदे भारत आणि मेट्रो प्रकल्पासाठी काम करणारे रेल्वे कर्मचारी, केंद्रीय योजनांचे लाभार्थी आणि ‘विकसित भारत’ कार्यक्रमाचे ॲम्बेसेडर यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले जाणार आहे.

दरम्यान, शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनाने काही पाऊले उचलली आहेत. यामध्ये ९ जूनपर्यंत राष्ट्रपती भवन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद राहणार आहे. शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रपती भवन खुले केले जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -