नारायण राणे यांनी मानले कोकणाच्या जनतेचे मन:पूर्वक आभार!

  150

कणकवली : कोकणातील जनतेने व मतदारांनी पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवून, मला खूप प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा दिल्याबद्दल मी माझ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जनतेचे व मतदारांचे मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.


मला अभिमान आहे की, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री जगत प्रकाश नड्डा जी, माननीय गृहमंत्री श्री अमित शहा जी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला.


हा विजय माझ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जनतेचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे. महायुतीचे सर्व नेते, निलेश राणे आणि नितेश राणे यांनी जी प्रचंड मेहनत घेतली, त्याचमुळे माझा हा विजय झाला. भविष्यात मी कोकणाचा विकास नव्या उंचीवर नेण्यास वचनबद्ध असेन.


माझ्या विजयासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार..


- आपला नारायण राणे

Comments
Add Comment

"चंद्रपूरला प्रदूषणमुक्त करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट शासनाने राबवावा"

भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांची सभागृहात शासनाला विनंती मुंबई: चंद्रपूर हे शहर औद्योगिक शहर आहे. खाणी,

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

बस आणि रिक्षा-टॅक्सीनंतर आता कॅब प्रवास ही महागला..! ओला, उबेर, रॅपिडोच्या भाडेदरात दुप्पट वाढ

मुंबई: सध्या महागाई इतकी वाढत चालली आहे की, त्याचा फटका मध्यमवर्गीयांना पडत आहे. बस आणि रिक्षा-टॅक्सीनंतर आता कॅब

डोळ्यांना खिळवून ठेवणारा टीझर ... 'रामायणा'च्या रंजक गोष्टीची पहिली झलक...

काल 'रामायण: द इंट्रोडक्शन' हा सिनेमा नऊ शहरांमध्ये प्रदर्शित होणार अशी घोषणा झाली आणि सर्व प्रेक्षकांचा उत्साह

Insurance Awareness Committee Update: ‘सबसे पहले लाईफ इन्शुरन्स’ मोहिमेद्वारे विमा जागरूकता समिती संरक्षण-प्रथम आर्थिक नियोजनाला चालना

मुंबई: भारताला जीवन विमा संरक्षणातील एका महत्त्वपूर्ण तफावतीचा सामना करावा लागत आहे जो २०१९ मध्ये ८३% वरून २०२३

लिव्हरपूरलचा फुटबॉलपटू डिओगो जोटाचं कार अपघातात निधन

माद्रिद: पोर्तुगाल आणि लिव्हरपूलचा फुटबॉलपटू डिओगो जोटाचे वयाच्या २८ व्या वर्षी कार अपघातात निधन झाले आहे. जोटा