Friday, July 19, 2024
Homeक्राईमGold Smuggling : कस्टम विभागाची मोठी कारवाई! मुंबई विमानतळावर १० किलो सोनं...

Gold Smuggling : कस्टम विभागाची मोठी कारवाई! मुंबई विमानतळावर १० किलो सोनं जप्त

शॅम्पू बॉटल, रबर शीटमधून सोन्याची तस्करी

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) सातत्याने सोने तस्करीचा (Gold Smuggling) पर्दाफाश केला जात आहे. मुंबई कस्टम विभागाने (Custom Department) काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर तब्बल ७.४४ कोटी रुपयांचे सोनं जप्त (Seized gold) केले होते. हे प्रकरण ज्वलंत असताना आणखी असे प्रकरण मुंबई विमानतळावर घडल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये कस्टम विभागाने तब्बल १० किलो सोनं जप्त केल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,कारवाईमध्ये कस्टम विभागाने ९.७६ किलो सोन्यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किंमत ६.७५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे सोन्याची तस्करी शॅम्पू बॉटल तसेच रबर शीटमधून सुरू होती. प्रवाशाने गुदद्वारातून सोन्याची तस्करी केल्याचे उघड झाले आहे.

त्याचबरोबर कस्टम विभागाने ८८ लाख रुपयांच्या किमतीचे परदेशी चलन देखील जप्त केले आहे. याप्रकरणी चार प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची कसून चौकशी सुरु करण्यात आली असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. तर चौकशीमध्ये चार आरोपींसह आणखी काही गुन्हेगार जाळ्यात सापडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -