Pune car accident : पुण्याच्या ससूनमधील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब!

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी कोणता नवा खुलासा होणार?


पुणे : पुण्यात एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात पोर्शे कार चालवत दोन तरुणांना चिरडल्याच्या घटनेने (Pune Car Accident) सध्या खळबळ उडवून दिली आहे. हा मुलगा पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांचा मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणाच कशा प्रकारे कामाला लागली आहे, याचे रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. काल ससून हॉस्पिटलधील (Sassoon Hospital) दोन वरिष्ठ डॉक्टरांनीच धनिकपुत्राच्या ब्लड सॅम्पल्सची (Blood Samples) अदलाबदल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यानंतर आता ससूनच्या रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. त्याच्या गायब होण्याशी अपघात प्रकरणाचा संबंध असल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे.


सुरुवातीला फक्त एक डिंक अँड ड्राईव्ह अपघात असे स्वरुप असलेल्या या प्रकरणाने पुण्यातील संपूर्ण शासनयंत्रणेची पोलखोल केली आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील पोलीस, आरोग्य आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कारभाराची काळी बाजू समोर आली आहे. सध्या ससून रुग्णालय हे पुणे अपघात प्रकरणाचे केंद्रस्थान बनले आहे. दरम्यान, आज रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब असल्याचे सांगितले जात आहे. हा कर्मचारी नेमका कोण आहे आणि याप्रकरणात त्याची नेमकी भूमिका काय होती?, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.


प्राथमिक माहितीनुसार, हा कर्मचारी गायब नसल्याचे पोलीस सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र ते त्याचा शोध घेत असल्याचे समजत आहे. तसेच पुणे अपघातानंतर पोलिसांनी ससून रुग्णालयाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजमध्ये दिसणाऱ्या सर्व व्यक्तींना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. जो येणार नाही, त्याला शोधून जबरदस्तीने आणले जाईल, अशी माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली आहे.


तत्पूर्वी ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय तपासणी आणि उपचारासंदर्भात झालेल्या गैरप्रकाराच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी समितीच्या प्रमुख डॉ. पल्लवी सापळे या मंगळवारी सकाळी रुग्णालयात पोहोचल्या. त्या ससूनच्या रक्त चाचणी विभागातील कार्यपद्धती कशी आहे, याची माहिती घेतील. त्याआधारे ससूनच्या डॉक्टरांनी धनिकपुत्राची ब्लड सॅम्पलची अदलाबदल कशी केली?, याविषयीचा अहवाल डॉ. पल्लवी सापळे सादर करतील.

Comments
Add Comment

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे