Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरमध्येही पुण्यासारखा 'हिट अँड रन' प्रकार! राजकीय नेत्याच्या गाडीने बापलेकाला उडवलं

दुसरा दिवस उलटूनही गुन्हा दाखल नाही 


छत्रपती संभाजीनगर : पुण्यात एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात पोर्शे कार चालवत दोन तरुणांना चिरडल्याच्या घटनेने (Pune Car Accident) सध्या खळबळ उडवून दिली आहे. हा मुलगा पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांचा मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणाच कशा प्रकारे कामाला लागली आहे, याचे रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यातच आता अशीच एक 'हिट अँड रन'ची (Hit and Run) घटना छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) समोर आली आहे. एका राजकीय नेत्याच्या गाडीने दुचाकीवरून जाणाऱ्या बाप लेकाला उडवले. शिवाय मदत करण्याऐवजी ते पळून गेले. ही घटना काल घडली असून दुसरा दिवस उलटल्यानंतरही अद्याप राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.


संभाजीनगरमधील वाडगावात बाप लेकाला एका गाडीने उडवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. ही गाडी एका राजकीय नेत्याची असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले होते. अपघातग्रस्त बाप लेकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, गाडीच्या टायर्सचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. विशेष म्हणजे एवढे सगळं होऊनही नेते अपघातग्रस्तांच्या मदतीला आलेले नाहीत.


या घटनेमुळे पुण्यातील घटनेप्रमाणेच संभाजीनगर प्रकरणात देखील पोलीस (Police) यंत्रणा राजकीय दबावाला बळी पडत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जखमी मुलगा काय म्हणाला? 


दरम्यान, अपघातग्रस्त जखमी मुलाने या प्रकरणी गाडी चालवणाऱ्यांना तुरुंगात टाकले पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे. तो म्हणाला, आम्ही एका लग्नासाठी आमच्या गावी गेलो होतो. परतत असताना माझे वडील आणि मी दुचाकीवरुन येत होतो. अर्ध्या रस्त्यात असताना एका पांढऱ्या रंगाच्या गाडीने आम्हाला उडवले. कदाचित ते दारु प्यायलेले होते. आम्ही त्यांना हाताने इशारा करत होतो. तरीही त्यांनी आम्हाला उडवले. त्यानंतर आम्ही खड्ड्यात जाऊन पडलो. आमची मदत करण्यासाठी देखील ते थांबले नाहीत, असं अपघातग्रस्त मुलाने म्हटलं आहे.
Comments
Add Comment

नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग : नांदोस येथील शिवकालीन गढीचे पुरातत्वीय उत्खनन पुरातत्व विभागातर्फे करण्यात येत असून या उत्खननात

Minister Ashish Shelar : नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग दौऱ्यात आधार किट वाटप व दिक्षांत समारंभ सिंधुदुर्ग : नांदोस य

Appreciating Swadeshi : स्वदेशी सल्लागार कंपन्यांचे साह्य घेणारा कौशल्य विकास विभाग राज्यात प्रथम

स्वदेशीचा पुरस्कार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार मुंबई : राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री

धक्कदायक! जन्मदात्या आईने 'या' कारणामुळे केली ६ वर्षीय चिमुकल्याची निर्घृण हत्या

बीड : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानं आईने प्रियकराच्या साथीनं चक्क ३ वर्षाच्या चिमुकल्याची पाण्यात बुडवून आणि

Why is Sharad Pawar silent on 'Urban Naxalites' : वारकरी संप्रदायातील 'अर्बन नक्षलवाद्यां'वर शरद पवार गप्प का?

नवनाथ बन यांचा सवाल; लव्ह जिहाद, लांगुलचालनावरून विरोधकांवर टीका मुंबई : "वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची

CM Devendra Fadnavis : छगन भुजबळ हेलिकॉप्टर अपघात प्रकरणाची चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाती लँडिंगबाबत