Tuesday, April 29, 2025

देशमहत्वाची बातमी

दिल्ली : बेबी केअर सेंटरमध्ये लागली भीषण आग, ६ नवजात बाळांचा मृत्यू

दिल्ली : बेबी केअर सेंटरमध्ये लागली भीषण आग, ६ नवजात बाळांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीच्या विवेक विहार परिसरात एका बेबी केअर सेंटरमध्ये शनिवारी रात्री उशिरा आग लागली. या दुर्घटनेत कमीत कमी ११ नवजात बाळांना तेथून काढण्यात आले. दरम्यान, यातील ६ नवजात बाळांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ५ नवजात बाळे रुग्णालयात दाखल झाले आहेत.

दिल्ली अग्शिमन विभागाच्या माहितीनुसार रात्री ११.३२ वाजता त्यांना एक कॉल आला आणि नऊ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले इमारतीततून ११ नवजात बाळांना काढण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ६ जणांचा मृ्त्यू झाला. एका मुलांसह ६ आणखी नवजात बाळांवर उपचार केले जात आहे.

 

आग लागण्याचे कारण स्पष्ट नाही

आतापर्यंत ही माहिती मिळालेली नाही की रुग्णालयात आग कोणत्या कारणामुळे लागली. दिल्ली पोलीस आणि फायर डिपार्टमेंट याबाबतचा तपास करत आहे.

Comments
Add Comment