Tuesday, July 2, 2024
Homeताज्या घडामोडीJalgaon-Pune Air Service : जळगाव -पुणे प्रवास आणखी सुपरफास्ट; करता येणार विमानप्रवास!

Jalgaon-Pune Air Service : जळगाव -पुणे प्रवास आणखी सुपरफास्ट; करता येणार विमानप्रवास!

तिकीट बुकिंगला सुरुवात

जळगाव : गेल्या महिन्यात गोवा जळगाव (Jalgaon) हैदराबाद अशी विमानसेवा फ्लाय ९१ विमान कंपनीने सुरू केली. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून पुणे विमानसेवा सुरू करण्याबाबत जळगावकरांची मागणी होती. त्यानुसार आता जळगाव-पुणे विमानसेवा (Flight Service) देखील सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे प्रवाशांचा जळगाव -पुणे प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार उड्डाण ५.० योजनेअंतर्गत जळगाव विमानतळावरून फ्लाय ९१ विमान कंपनीने विमानसेवा सुरू केली आहे. १८ एप्रिल पासून गोवा हैदराबादला विमानसेवा सुरू केल्यानंतर जळगाव पुणे विमानसेवा देखील सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. मागणीनुसार विमान कंपनीने पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता विमान सेवा सुरू केली आहे. ही सेवा २७ मे पासून सुरु होणार असून आठवड्यातून चार दिवस राहणार आहे.

तिकीट बुकिंगला सुरुवात

विमान कंपनीने २७ मे ते २६ ऑक्टोबर दरम्यान गोवा जळगाव पुणे या विमानसेवेचे शेड्युल तयार केले आहे. त्यानुसार तिकीट बुकिंगला देखील सुरुवात झाली आहे. यात गोवा – जळगाव – गोवा ही सेवा दररोज तर पुणे – जळगाव – पुणे ही सेवा आठवड्यातील मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार अशी राहील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -