पाचव्या टप्प्याच्या मतदानानंतर भाजप जिंकलीय ३१० जागा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मोठा दावा


ओडिशा : देशात २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठाच दावा केला आहे. ते म्हणाले, 'पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपला आधीच ३१० जागा मिळाल्या आहेत.


ओडिशमध्ये आयोजित एका प्रचार सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी हा दावा केला आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपला आधीच ३१० जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीचे देशात आणखी दोन टप्पे शिल्लक असून सहाव्या आणि सातव्या फेरीच्या मतदानानंतर आम्हाला ४०० हून अधिक जागा मिळतील, असेही शहा यांनी म्हटले आहे.


दरम्यान सभेला संबोधित करताना शाह म्हणाले की, यावेळी ओडिशात कमळ फुलणार आहे. भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना संबलपूरमधून उमेदवारी दिली आहे.


राज्यात (ओडिशात ) मूठभर अधिकाऱ्यांची सत्ता असल्याचा आरोप अमित शहा यांनी यावेळी केला. या निवडणुकीमुळे राज्यातील सध्याचे बाबूराज संपणार असल्याचे ते म्हणाले, देशातील बहुतांश खाणी आणि खनिज साठे केओंझार जिल्ह्यात असूनही येथील आदिवासींना कोणताही लाभ मिळालेला नाही.


या पूर्वीच्या केंद्रातील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करताना अमित शहा म्हणाले की, 'काँग्रेसने आदिवासींसाठी काहीही केले नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आदिवासीची प्रकरणे हाताळण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले होते, तर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात नक्षलवाद संपवण्याचे काम केले आहे.
'‘मोदींनी डिस्ट्रिक्ट मिनरल फाऊंडेशन स्थापन करून आदिवासी भागाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये दिल्याचे सांगुन शहा म्हणाले, मोदी सरकारच्या काळात आदिवासींसाठी अर्थसंकल्पीय तरतूद १.२५ लाख कोटी रुपये करण्यात आली होती. तर आधीच्या यूपीए सरकारच्या काळात फक्त २५ हजार कोटी रुपये इतकीच तरतूद होती.‘

Comments
Add Comment

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांच्या हत्येचा प्रयत्न

जम्मू : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या