Licence : २० मे रोजीची अपॉइंटमेंट घेतली असल्यास मुंबईत वाहन परवाना चाचण्यांच्या वेळेत बदल

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या अखेरच्या टप्प्यातले मतदान उद्या होत असल्यामुळे वाहन चालनाच्या कोणत्याही प्रकारच्या परवान्याच्या चाचणीकरीता मुंबईत होणा-या चाचण्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा चाचण्यांसाठी जाणा-या इच्छुकांनी चाचणीची वेळ नव्याने तपासून घ्यावी.


परिवहन विभागाचे संकेतस्थळ https://parivahan.gov.in द्वारे अनुज्ञप्ती (Licence) संबंधीची सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. त्यासाठी कार्यालयात येणा-या नागरिकांना शिकाऊ परवाना चाचणी व पक्का परवाना वाहन चालक चाचणी देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अपॉइंटमेंट घेणे अनिवार्य आहे.


त्याअनुषंगाने २० मे २०२४ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) या कार्यालयात शिकाऊ परवाना चाचणी व पक्का परवाना वाहन चालक चाचणीकरीता घेतलेल्या अपॉइंटमेंटच्या तारखेत लोकसभा निवडणूक मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे बदल करण्यात आला आहे. आता ही चाचणी २२ मे २०२४ रोजी होणार आहे.


ज्या उमेदवारांची पक्के परवान्याकरिता वाहन चालक चाचणी २० मे २०२४ रोजी होती, ती २१ ते २४ मे २०२४ दरम्यानच्या कालावधीमध्ये बदल (Re-schedule) करण्यात आली आहे. तसेच त्याबाबत प्रणालीमध्ये नमूद भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रणालीकडून संदेश (मेसेज/SMS) देखील पाठविण्यात आले आहेत. तरी कार्यालयात येणा-या सर्व उमेदवार, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी यांनी २० मे रोजीची अपॉइंटमेंट घेतली असल्यास, त्या सर्वांनी चाचणीसाठी कार्यालयास या दिवशी भेट न देता बदल केलेल्या (Re-scheduled) दिनांकांस भेट द्यावी. संबंधित कागदपत्रांसह बदल केलेल्या दिनांकास उमेदवारांनी कार्यालयात चाचणीकरिता उपस्थित राहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०