Manoj Jarange Patil : लोकसभेच्या निकालाच्या दिवशीच मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार!

  56

'या' कारणासाठी करणार उपोषण


जालना : मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी लावून धरत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यभरातल्या मराठ्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी केलेल्या उपोषणामुळे राज्य सरकारनेही मराठा आरक्षणासाठी कंबर कसून प्रयत्न केले आणि मराठ्यांना त्यांचे हक्काचे आरक्षण मिळवून दिले. मात्र, त्यानंतर जरांगे यांच्या मागण्या बदलत गेल्या आणि त्या पूर्ण न करण्याबाबत त्यांनी सरकारला जबाबदार धरले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले. त्यामुळे जरांगेंना सर्वच स्तरांतून रोष पत्करावा लागला. यानंतर जरांगेंचा प्रभाव कमी झाला. मात्र, ते आता पुन्हा एकदा उपोषण करणार, अशी त्यांनी घोषणा केली आहे. लोकसभेच्या निकालाच्या (Loksabha Election Result) दिवशीच म्हणजे ४ जूनपासून मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत.


देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. राजकीय पक्षांचं भवितव्य ठरवणार्‍या या निवडणुकीत विजयाकरता प्रत्येक पक्ष जोरदार प्रचार करत आहे. मात्र, त्यातच मनोज जरांगेंनी उपोषणाची घोषणा करत माध्यमांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारने दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा मराठा समाजाला फायदा झालेला नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.


माध्यमांशी बोलताना आज मनोज जरांगे म्हणाले, “माझा हा लढा मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आहे. मी ४ जूनपासून पुन्हा बेमुदत उपोषण करणार आहे. मुळात सर्वच पक्षात मराठा समाजाचे नेते आहेत. मराठा कोणताही असला तरी त्याला राज्य सरकारने दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा कोणताही फायदा झालेला नाही. यामध्ये भाजपातील गरीब मराठा समाजाच्या मुलांचंही नुकसान झालं आहे. सरकारने १० टक्के आरक्षण दिलं आहे, पण ते अजूनही लागू झालेलं नाही”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.


पुढे ते म्हणाले, “४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल असला, तरी सकाळी ९ वाजता माझ्या उपोषणाची सुरुवात होईल. जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे. सहा कोटी मराठा समाजाचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे. मराठा समाजाला आता सगळं माहिती आहे. एका मुलाप्रमाणे ते माझी काळजी घेतात. माझे उपोषण सुरु झाल्यानंतर मराठा समाज गावोगावी शांततेत आंदोलन करेल, असा मला विश्वास आहे”, असं ते म्हणाले.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची