Monday, July 1, 2024
Homeराशिभविष्यसाप्ताहिक राशिभविष्यWeekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १२ ते १८ मे २०२४

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १२ ते १८ मे २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, १२ ते १८ मे २०२४

अनुकूल काळ

मेष : शिक्षण, नोकरी-व्यवसायात अनुकूल काळ आहे. ज्या व्यक्तीची खूप मोठ्या कालावधीमध्ये अपेक्षित ठिकाणी बदली झाली नसेल, तर आता होण्याची शक्यता आहे. नवीन कलाकारांना संधी प्राप्त होणार आहे. चांगल्या कलाकारांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी होणार आहेत. स्टॉक मार्केटमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू नये. अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये छोट्या-मोठ्या प्रमाणात झालेली चहाच्या पेल्यातील वादळे आता संपणार आहेत. अपेक्षित व्यक्तींकडून सहकार्य मिळणार आहे. आपल्या मनाप्रमाणे कार्यभाग साधणार आहे.

आनंदाचे वातावरण

वृषभ : शुभ ग्रहांची मोठ्या प्रमाणावर साथ लाभणार आहे. त्यामुळे भौतिक जीवन सुखमय होणार आहे. पैशाची आवक वाढल्यामुळे खरेदी होईल. घरातील वातावरण आनंदी राहणार आहे. जुन्या गुंतवणुका भरघोस आर्थिक फायदा मिळवून देतील. त्याचप्रमाणे नवीन गुंतवणूक करू शकाल. जमीन-जुमला, स्थायी मालमत्ता यासंबंधी रखडलेल्या व्यवहारातून चांगला फायदा होऊ शकतो, कारण असे व्यवहार मार्गस्थ होऊन पूर्णत्वाच्या मार्गाकडे राहतील. समाजातील मान्यवर व्यक्तींच्या मदतीमुळे कामे यशस्वी करू शकाल. बरेच दिवस मनात राहिलेली एखादी इच्छा पूर्ण होईल. जीवन गतिमान होईल. आनंदाचे वातावरण असणार आहे. विनयशीलता राखावी.

इच्छा पूर्ण होतील

मिथुन : नोकरी-व्यवसायात ताण निर्माण होणार आहे. जास्त काम आणि कमी पैसे, आऊटपुटही कमी मिळणार आहे. उत्पन्नापेक्षा खर्च वाढणार असल्यामुळे, बचतीच्या बजेटमध्ये गडबड होणार आहे. व्यापार-व्यवसायात दुकानाचे किंवा शोरूमचे रेंट अचानक वाढल्यामुळे अधिक भार पडल्यामुळे, आर्थिकदृष्ट्या ताणतणाव निर्माण होणार आहे. संयम बाळगा. कालावधीमध्ये तुम्हाला स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल, तरच तुमचे ध्येय पूर्ण होईल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तसेच तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. व्यवहार लक्षात ठेवूनच निर्णय घ्या. कौटुंबिक बाबतीत अनुकूल काळ.

प्रयत्न यशस्वी होतील

कर्क : आपल्या नोकरी, व्यवसायात, करिअरमध्ये महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतो. आपले प्रत्येक निर्णय आपल्या बुद्धिचातुर्याने आणि विवेकाने घ्यावे, तरच आपल्या जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करू शकाल. बेरोजगार व्यक्तींना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळण्याची संभावना आहे. जुनी नोकरी बदलण्याच्या प्रयत्नात असाल, तर नवीन नोकरी शोधण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे आवश्यक राहील. त्याचप्रमाणे बदलीची शक्यता. काही व्यक्तींना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची असल्यास, थोडा काळ वाट बघा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल.

जनसंपर्क वाढेल

सिंह : व्यापार-व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगले बदल होतील. व्यापार-व्यवसाय वाढवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. भागीदारीमध्ये किंवा नोकरी व व्यवसायात आपला जनसंपर्क वाढणार आहे. मात्र सर्व दृष्टिकोनातून आपल्याला लक्ष देऊन काम करावे लागेल. इतरांवर अवलंबून राहणे महागात पडू शकते. स्वतःची कामे स्वतः करा. आजचे काम उद्यावर ढकलू नका. आळस झटका. यश मिळेल. राजकीय क्षेत्रातील जातकांचा जनसंपर्क वाढेल. केलेल्या कार्याची प्रशंसा होईल. एखादी महत्त्वाची जबाबदारी घ्यावी लागेल.

अपशब्द वापरू नका

कन्या : सदरच्या कालावधीमध्ये आपणास निश्चितच स्थिरता मिळणार आहे. चहूकडून आपल्याला चांगल्या बातम्या समजतील. त्यामुळे मनामध्ये उत्साह व आनंद असेल. ज्या लोकांना परदेशगमनाची अपेक्षा आहे, त्यांना परदेशगमन निश्चित होईल. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी ज्या परीक्षा दिल्या आहेत, त्याचे रिझल्ट चांगले येतील. कोर्ट-कचेरीचा निकाल आपल्या बाजूने लागतील. अपशब्द वापरू नका. मनस्ताप होऊ शकतो. सबुरीने निर्णय घ्या. वाद-विवाद वाढवू नका.

नाती मजबूत होतील

तूळ : आपल्या मित्रांच्या मदतीने थांबलेला पैसा पुन्हा तुम्हाला प्राप्त होईल. जे व्यक्ती बेरोजगार आहेत, त्यांना चांगल्या नोकऱ्या चालून येतील. आर्थिक बाबतीमध्ये सकारात्मक बदल होणार आहेत. कौटुंबिक जीवनात नाती मजबूत होतील. पण सासू-सुनेमध्ये वाद जास्त वाढू देऊ नका. विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात पुढे जात असतील, पण इंजिनीअर किंवा टेक्निकल साइडमध्ये जे विद्यार्थी आहेत, त्यांना मात्र जास्त कष्ट करावे लागणार आहेत. आपण भाग्यापेक्षा कर्म करण्याला महत्त्व दिले, तर यश आपलेच आहे. ज्यांना लग्न करण्याची इच्छा आहे, त्यांना योग्य जीवनसाथी मिळेल.

कौटुंबिक समस्या सुटतील

वृश्चिक : नोकरीमध्ये बदल होतील. स्थान बदलाचे योग आहेत. नव्या नोकरीविषयी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. धार्मिक क्षेत्रात किंवा अध्यात्मामध्ये आपली आवड निर्माण होईल. या कालावधीमध्ये आपल्याकडे ज्या काम करणाऱ्या व्यक्ती होत्या, त्या सोडून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला नवीन कामगारांची भरती करावी लागेल. आपल्या व्यवसायामध्ये अचानक आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी शांततापूर्वक मार्ग काढावा लागेल. कौटुंबिक समस्या सुटतील. पूर्ण विचाराअंती निर्णय घ्या. विनयशीलता राखावी.

लांबचे प्रवास होऊ शकतात

धनु : प्रॉपर्टी डीलर, बिल्डिंग मटेरियल सप्लायर यांच्याशी संबंधित असलेल्या व्यवसायांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आपल्या करिअरसाठी हा खूपच चांगला योग आहे. जे जातक नोकरीच्या शोधात होते, त्यांना उत्तम नोकरी मिळेल. ज्यांना सरकारी नोकरीत बदली हवी आहे, त्यांना बदली मिळेल, बदली इच्छित ठिकाणी होईल. नोकरी-व्यवसायासंबंधी लांबचे प्रवास होऊ शकतात. या प्रवासाचे परिणाम चांगले मिळतील. नवीन संधी प्राप्त होतील.

आर्थिक स्थितीमध्ये चढ-उतार

मकर : या सप्ताहात काही योगामुळे आपल्या आर्थिक स्थितीमध्ये चढ-उतार होण्याची शक्यता आहे. काही अंशी आर्थिक स्थिती चिंताजनक असू शकते. पण लवकरच आपली आर्थिक स्थिती चांगली होईल. घरामध्ये कुटुंबामध्ये सुरुवातीपासून चाललेले वाद-विवाद कमी होतील. घरामध्ये आनंदाचे व खेळीमेळीचे वातावरण निर्माण करणे जरुरीचे आहे. प्रेम प्रकरणांसाठी हा कालावधी चांगला आहे. जर आपल्याला कोणाला प्रपोज करायचा असल्यास, तुम्ही या कालावधीमध्ये करू शकता. यासाठी हा कालावधी आपणास अनुकूल आहे. आपण आपल्या प्रियजनांबरोबर सहलीला जाऊ शकता.

चांगले फायदे

कुंभ : आपल्या जन्मगावी किंवा जन्म गावापासून दूर दोन्ही ठिकाणी कुठेही असाल, तेथे आपणास चांगले लाभ होणार आहे. मागे काही योजना आपण बनवल्या होत्या, त्यावेळी त्याचा फायदा झाला नाही, पण आता त्याचे नियोजन करून, त्याचे आयोजन करा, त्यात नक्की फायदा होईल. आपले कार्यक्षेत्र विस्तार करण्याची चांगली संधी आहे. नवीन नोकरीची संधी मिळेल. नवीन बिजनेस सुरू करण्यासाठी हा कालावधी उत्तम आहे. सामाजिक तसेच धार्मिक कार्यामध्ये रस घेऊन सक्रिय योगदान द्याल. इम्पोर्ट-एक्सपोर्टच्या व्यवसायामध्ये आपणास यश येईल. परदेशातून आपणास चांगले फायदे मिळू शकतात.

आर्थिक सोयी होतील                                                         

मीन : आपण आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवताना आपल्याला पुष्कळ ऊर्जा व चैतन्य जाणवेल. प्रेमिकांना मात्र आपल्या भावनांवर संयम राखणे आवश्यक आहे. अन्यथा दोघांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे मतभेद होऊ शकतात. व्यापार, व्यवसाय व नोकरी करणाऱ्यांना हा कालावधी अतिशय उत्तम आहे. कलाकारांना नवीन संधी मिळतील. आपले प्रत्येक कार्य सहजतेने पूर्ण होईल. पूर्वी राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी, आपल्याला वरिष्ठांचा देखील सहयोग मिळू शकतो. विद्यार्थ्यांना पालक व शिक्षकांचे पूर्ण मार्गदर्शन लाभेल. आर्थिक सोयी होतील. तसेच कुटुंबातील सदस्यांकडून मदतीचा हात मिळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -